पोलिसांच्या नजरेतून सुटलेच नाही, एका क्षणात पोलिसांनी डाव ओळखला; कारवाई समोर आली धक्कादायक बाब…
गस्तीवर असलेल्या आडगाव पोलिसांना दोन गुन्हेगार आढळून आल्याने त्यांच्याकडून मोठे गुन्हे उघडकीस आले आहे. त्यावरुन आडगाव पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
नाशिक : पोलिस गस्तीवर राहिले आणि त्यांना एखादी हालचाल संशयास्पद वाटली तर त्यातून अनेकदा मोठ्या घटना उघडकीस आल्या आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. नाशिक शहर हद्दीत असलेल्या आडगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शिलापूर हद्दीत आडगाव पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मध्यरात्री जात होते. पेट्रोलिंगचा भाग असल्याने त्यांनी एका ठिकाणी दोघे जण जातांना निदर्शनास आले. यावेळेला दोघांकडे दोन वेगवेगळ्या दुचाकी होत्या. एकाकडे यामाहा तर एकाकडे पल्सर गाडी होती. दोन्ही गाड्यांना नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तिथून पळ काढला. त्याच वेळेला पोलिसांना संशय आला.
दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतांना दोघांनी पळ काढत असतांना गुन्हेगार असावेत असा तर्क लावला. पळून जाण्याचा तयारीत असलेल्या दोघा जणांना पोलिसांनी गोलू टी स्टॉल शिलापूर जवळ ताब्यात घेतले.
दोघांची कसून तपासणी केली त्यामध्ये त्यांच्याकडे अंगझडतीत सोन्या चांदीचे दागिने देखील मिळून आले. त्यांनी उपनगर आणि कसारा परिसरातून मोटार सायकल चोरी केल्याचे समोर आले आहे याशिवाय दिंडोरी जानोरी येथे घरफोडी केल्याचे कबुल केले आहे.
नांदूर नाका परिसरात राहणारा श्रावण पोपट भालेराव आणि जेलरोड नाशिकरोड येथे राहणारा सोनू उर्फ अनिल माणिक शिंदे असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयितांची नाव असून त्यांकडून उपनगर पोलीस व दिंडोरी पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून आडगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. दरम्यान पोलिस सतर्क असल्याने हे गुन्हे उघडकीस आले असल्याने आडगाव पोलिसांचे या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.