Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणि तिचा तो सेल्फी अखेरचा ठरला, उरल्या फक्त आठवणी; तिचा मित्र ढसाढसा रडायला लागला, नागरिक जमले आणि…

पर्यटनस्थळी जातांना काळजी घ्या, धोकेदायकठिकाणी सेल्फी किंवा फोटो काढणे टाळा अन्यथा तुमचा एखादा सेल्फी शेवटचा सेल्फी राहू शकतो आणि तुमचं आयुष्य बेरंग होऊन जाईल.

आणि तिचा तो सेल्फी अखेरचा ठरला, उरल्या फक्त आठवणी; तिचा मित्र ढसाढसा रडायला लागला, नागरिक जमले आणि...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:51 AM

नाशिक : पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यावर काळजी घ्या असं आवाहन वारंवार केलं जातं. अनेकदा सेल्फीच्या नादात दुर्दैवी घटनाही घडत असते. यामध्ये तरुणाईची संख्या नेहमीच लक्षणीय असते. पोलिसांकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केली जाते. मात्र, त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. नुकताच एक दुर्दैवी घटना नाशिकच्या सोमेश्वर धबधबा येथे घडली आहे. खरंतर ऐन उन्हाळ्यात पाऊस पडल्याने वातावरण पावसाळ्यासारखं आहे. त्यामुळे अनेक तरुण तरुणी यांचे पाऊले पर्यटनस्थळाकडे वळत आहे. नाशिकच्या सोमेश्वर येथे धबधबा असल्याने मोठी गर्दी होत असते. अशीच सिन्नर येथील तरुणी आपल्या मित्रासोबत फिरायला आलेली होती.

सोमेश्वर धबधबा येथे निसर्गरम्य वातावरण, खळखळून वाहणारे पाणी पाहून तरुणीला सेल्फी काढण्याचा मोह झाला. उंच ठिकाणी चांगले फोटो काढता येईल म्हणून मित्राला घेऊन उभी राहिली. फोटो काढण्याच्या नादात ती हळूहळू पुढे सरकत गेली. पण जे नको घडायला तेच घडलं.

तरुणीचा पाय घसरला, मित्राने तिला वाचविण्याचा प्रयत्नही केला पण काही क्षणात उंच धबधबा येथून निसटली आणि नदीपात्रात पडली. त्यात तिला जबर मार लागल्याने तिचा मृत्यूच झाला होता. बाजूला असलेल्या नागरिकांनी तिला बाहेर काढले, आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शिवांगी जयशंकर सिंह यांना तपासून मृत घोषित केले. शिवांगी हिच्या सोबत तिचा मित्र आदित्य देवरे होता. आणि त्याच्या जोडीला एक शिवाजी म्हणून मुलगाही होता.

गंगापुर रोड पोलिस ठाण्यात शिवांगीच्या मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापुर पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

दरम्यान, पर्यटनाला जातांना काळजी घ्या असं म्हणण्याबरोबरच एक सेल्फी तुमच्या आयुष्याचा बेरंग करू शकतो. त्यामुळे धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढणं टाळा असं आवाहन करण्याची वेळ प्रशासनावर पुन्हा पुन्हा येत आहे.

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.