शर्ट उलटा घातला म्हणून नको ते घडलं, प्रियकराने डोळ्यादेखत मुलासोबत जे केलं ते धक्कादायक आहे, नाशकात खळबळ
नवऱ्यासह मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून जाणं एका महिलेच्या चांगलेच अंगलट आले आहे. चार वर्षाच्या मुलाचं आपल्या डोळ्यात नको ते होतांना बघण्याची वेळ महिलेवर आली.
नाशिक : नाशिक निफाड तालुक्यातील बोकडदरे येथील एक विवाहिता आपल्या दोन मुलांसह पतीसोबत राहत होती. पती दारूचे व्यसन करत असल्याने एका प्रियकरासोबत एका मुलाला पतीकडे टाकून तर एकाला सोबत घेऊन फरार झाली होती. त्यामध्ये महिला ज्या प्रियकरासोबत राहत होती तो प्रियकर देखील त्याच गावातील होता. दोघांनी सिन्नर तालुक्यात एका शेतकऱ्याचा आसरा घेत मजूरी करत वास्तव्यास होते. त्यांच्या सोबत विवाहितेचा चार वर्षाचा मुलगा कृष्णाही सोबत होता. एक दिवस कृष्णा याने शर्ट उलटा घातलेला होता. गणेश घरी आल्यावर त्याने ते पहिले आणि विचारणा केली. त्यामध्ये त्याने मारहाण सुरू केली. शर्ट उलटा का घातला म्हणून काठीने मारू लागला. त्यात कृष्णाच्या डोक्याला लागले होते.
खरंतर पंधराच दिवस झाले होते हे पळून आले होते. गणेशने कुरापत काढून ही मारहाण केली होती, विवाहित काजल हिने वाद न घालता चहा ठेवला आणि तो मुलालाही प्यायला दिला. पण मुलाला त्रास होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले होते.
महिलेच्या लक्षात आले की मुलाला काहीतरी झाले आहे. तिने तात्काळ दवाखाण्यात जायचे म्हणून प्रियकराला सांगितले. दोघेही मुलाला घेऊन सिन्नर म्हध्ये पोहचले. एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले तेथील डॉक्टरांनी तपासले आणि जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात कृष्णाला उपचारासाठी दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच वेळी संशयित गणेश माळी याने रुग्णालयातून धूम ठोकली आणि थेट दिंडोरी येथील मोहाडी येथे पळून गेला होता. तात्काळ तिथे रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत कळविले होते.
सिन्नर पोलिसांनी याबाबत तात्काळ नोंद करून घेत. संशयित आरोपी गणेश माळी याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर 24 तासाच्या यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिकचा तपास ग्रामीण पोलिस करीत आहे.
संशयित गणेश याने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यावरून पोलिसांना त्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अवघ्या पंधरा दिवसापूर्वी ज्या प्रियकराच्या भरवश्यावर पळून गेलेल्या महिलेला पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीही राहिलेले नाही.