तिसऱ्यांदा संसाराचा काडीमोड झाला, वैतागलेल्या महिलेने घेतला मोठा निर्णय, दीड वर्षाच्या मुलीचाही विचार न करता…

दीड वर्षाच्या मुलीसह आई सविता कराटे हिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये आता वणी पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं याकडे लक्ष लागून आहे.

तिसऱ्यांदा संसाराचा काडीमोड झाला, वैतागलेल्या महिलेने घेतला मोठा निर्णय, दीड वर्षाच्या मुलीचाही विचार न करता...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 7:49 AM

नाशिक : अलिकडे सतत संकट येत राहिल्याने त्याला सामोरे जाण्याची क्षमता कमी झाल्याने आणि समाज काय म्हणेल या भीतीने अनेक जण आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतात. त्यामध्ये कधी आपल्या लहान मुलांचा देखील कुठलाही विचार करत नाही. असाच काहीसा एक प्रसंग नाशिकच्या वणी येथे घडला आहे. एक आठवड्यापूर्वी आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन एक महिला माहेरी राहायला आली होती. तिने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला अडगळीला गळफास देऊन संपवलं आणि नंतर स्वतःनेही तशाच पद्धतीने स्वतःला संपवून टाकलं आहे. आजूबाजूच्या महिलांनी बराच वेळ झाला म्हणून दरवाजा वाजुवून बघितला, फोनही करून बघितला कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता.

सविता विकास कराटे आणि तनुजा विकास कराटे यांचा कुठलाच संपर्क होत नव्हता, महिलांनी नळाला पाणी आले म्हणून बराच वेळ आवाज देऊन पहिला मात्र कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडला.

सविता हिने आपली आई घरी नसतांना मुलीसह आयुष्य संपविण्याचा थेट निर्णय घेतल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आणि तात्काळ नातेवाईकांना बोलविण्यात आले. ही बाब लागलीच पोलिसांनाही बोलावण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

वणी पोलिसांनी पंचनामा करून घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याच्या शक्यता आहे. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.

दरम्यान सविता यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत स्पष्टता नसली तरी समोर आलेली पार्श्वभूमी धक्कादायक आहे. सविता हीचे तीन वेळेस लग्न झाले होते, तिन्ही वेळेस संसार मोडल्याने दीड वर्षाच्या एका मुलीसह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता.

एक आठवड्यापूर्वी सविताच्या तिसऱ्या लग्नाचा काडीमोड झाला होता. त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांच्या पुढील तपासात कोणत्या बाबी समोर येतात याकडे सविताच्या नातेवाईकांचे आता लक्ष लागून आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.