टोळकं अचानक आलं…मारहाण करू लागलं, दात पाडले आणि डोक्यावर वार, नेमकं काय घडलं नाशकात? VIDEO
नाशिक शहरात भर दिवसा हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले असून नाशिकरोड पोलिसांनी जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : नाशिक रोड परिसरात एक हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील मॉडेल कॉलनी परिसरातील ही घटना आहे. गॅरेजच्या पायरीवर बसलेल्या गॅरेज चलकाच्या वडिलांवर टोळक्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या डोक्यात लोखंडी पट्टीही मारण्यात आली आहे. याशिवाय त्यांचे मारहाण तीन दातही पाडले आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध पडले होते.
मारहाण करत असतांना बाजुलाच बसलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीने मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र, तीन ते चार हल्लेखोरांनी मारहाण सुरूच ठेवली होती. नंतर आजूबाजूचे नागरिक जवळ येताच हल्लेखोरांनी पळ काढला आहे.
मारहाण करत असतांना हल्लेखोर यांनी मिळेल त्या वस्तूने मारहाण केली होती. हातात दगड होते त्यानेही डोक्यात मारहाण केली. याशिवाय जवळ पडलेल्या लोखंडी पट्टीने मारून त्यांचे तीन दातही पाडले आहे.
जेलरोडच्या मॉडेल कॉलनी परिसरात राहणारे अनिकेत योगेश मुळे यांचे हे गॅरेज आहे. गॅरेजमध्ये अनिकेत यांचे वडील योगेश मुळे हे येऊन बसलेले होते. त्याचवेळी कुणीही नसल्याने पाहून त्यांनी योगेश मुळे यांना लाथाबुक्कयांनी मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
नाशिक शहरात गुंडगिरी सुरूच, लोखंडी पट्टीने डोक्यात वार करत गॅरेज चालकाच्या वडिलांवर हल्ला; हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद… #nashik #police #cctv pic.twitter.com/MJGAECHEz0
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 11, 2023
नाशिकरोड पोलिसांनी या हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मुलगा न मिळाल्याने वडिलांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामध्ये सोनसाखळी चोरीची घटना ताजी असतांनाच नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हल्ल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.