तरुणी बिनधास्त सिगारेट ओढत होत्या, तरुणाला हेच खटकलं; चोरून व्हिडिओ काढला पण… VIDEO व्हायरल

नाशिक शहरातील एका पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. दोन गटात तूफान हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ शहरात व्हायरल झाला आहे.

तरुणी बिनधास्त सिगारेट ओढत होत्या, तरुणाला हेच खटकलं; चोरून व्हिडिओ काढला पण... VIDEO व्हायरल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 9:48 AM

नाशिक : पुरुष सर्रासपणे सिगारेट ओढतात, पण आजही काही मोठे शहरं वगळता मुली सिगारेट ( Girl Smoking ) ओढतांना दिसत नाही. ज्या शहरांना ग्रामीण भागाची किनार आहे अशा शहरात तरी मुलींचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी आहे. चोरून लपूनच मुली सिगारेट पितात असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. मात्र, यावरून नाशिकमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही देखील समोर आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यातच हे प्रकरण मुलींच्या घरापर्यन्त गेल्यानं चोरून लपून सिगारेट ओढणाऱ्या तरुणींनी धसका घेतल्याचं बोललं जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन अंबड पोलिस ठाण्यापासून ही घटना हाकेच्या अंतरावर घडली आहे. अश्विननगर परिसरात एक हॉटेल आहे. तिथे कॉलेजमधील तरुण तरुणी यांचा नेहमी वावर असतो. त्यात कुणी चहा-नाश्ता करण्यासाठी येतात तर कुणी सिगारेट ओढण्यासाठी येत असतात.

हे सुद्धा वाचा

नेहमीप्रमाणे काही तरुणी तिथ आल्या आणि त्यांनी चहाची आणि सिगारेटची ऑर्डर दिली. हॉटेलच्या वेटरने त्यांना चहा आणि सिगारेट आणून दिला आणि त्या गप्पा मारत मारत मग्न झाल्या. सिगारेट कश मारत चहाचे घोट घेत होत्या. पण त्याच वेळेला एक तरुण समोर येऊन बसला होता. त्यानेही चहाची ऑर्डर दिली.

तरुण चहा घेत असतांना त्याला मुलींची चहा सिगारेटची चांगलीच खटकली. त्याने लागलीच आपला मोबाइल काढून फोटो आणि व्हिडिओ काढण्यासह सुरुवात केली. पण हीच बाब त्यातील एका तरुणीच्या लक्षात आली. त्यांनी आपसात चर्चा केली. आणि तरुणांला जाब विचारायला सुरुवात केली.

यावेळी तरुण आणि तरुणी यांच्यात वाद निर्माण झाला. दोन गट पडल्याने दोन्ही बाजूने त्यांचा मित्रांना बोलविले. बाचाबाची सुरू असतांना त्यांच्यात तूफान राडा झाला. हॉटेल परिसरात राडा झाल्याने लागलीच पोलिस आले आणि काहींना ताब्यात घेतले. तर काहींनी पळ काढला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलिसांनी समज देऊन सोडून देण्यात आले आहे. यामध्ये मात्र या मारहाणीचा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरल झाला असून नाशिक शहरात या घटणेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.