भाऊबंदकीत तुंबळ राडा ! लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर गेले, नंतर थेट रुग्णालयात, VIDEO व्हायरल
ग्रामीण भागात जमीनचे वाद काही नवीन नाही. मात्र, कळवण मध्ये जी मारहाणीची घटना घडली आहे तिची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : ग्रामीण भागात सर्वाधिक वाद हे जमिनीतून होत असतात. कधी रस्त्यावर, कधी कुणाच्या शेतात पाणी गेल्यावरून किंवा बंधावरून होत असते. अशाच विविध कारणा वरुन वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र, यामध्ये वादच न होता दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे. सुरुवातील आपापसात बोलणं सुरू असतांना शिवीगाळ सुरू झाली. त्यामध्ये हाताने माराहण सुरू झाली. मात्र, त्यानंतर लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांवर हल्लाच केल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकमेकांची डोकी यामध्ये फोडली गेली असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील गांडाळमोख, तिऱ्हळ गावातील शेतकऱ्यांच्या दोन गटात जमिनीवरून वाद झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. हातात लाठ्या- काठ्या घेऊन तिऱ्हळ या गावातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे धावत जबर मारहाण केली आहे.
या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास केला जात आहे.
याच दरम्यान उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. यामध्ये दोन्ही गटातील शेतकरी एकमेकांना शिवीगाळ करत आहे. हातात येईल त्या वस्तूने एकमेकांवर तुटून पडत आहे. माराहण करत असल्याचे यामध्ये दिसून येत असून पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण मध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल #farmer #viralvideo #Nashik pic.twitter.com/LKgpM6acvG
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 15, 2023
शेतकऱ्यांमध्ये किंवा भाऊबंदकीत झालेला वाद महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ समोर आल्याने या मारहानीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये महिला देखील जखमी झाल्या आहेत.
या मारहाणीच्या दरम्यान जे चित्रीकरण करण्यात आले आहेत ते व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असतांना हा जमिनीचा किरकोळ वाद आता पोलिस ठाण्यात जाऊन पोहचला आहे.