नाशिकचं बिहार होतंय का? गेल्या दहा दिवसांत 6 प्राणघातक हल्ले, अडीच महिन्यांची आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल…

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी बघता शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक आणि शांत शहर म्हणून ओळख असल्याची स्थिती पाहता बिहार होत आहे का ? असा प्रश्न आता पडू लागला आहे.

नाशिकचं बिहार होतंय का? गेल्या दहा दिवसांत 6 प्राणघातक हल्ले, अडीच महिन्यांची आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल...
नाशिकमध्ये हल्ल्यात मॅनेजरचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 1:08 PM

नाशिक : गेल्या अडीच महिन्यांपासूनच्या गुन्हेगारीच्या घटना पहिल्या तर नाशिकचा बिहार होतोय का ? असा संतप्त सवाल दहशतीच्या सावटाखाली वावरत असलेल्या नाशिककरांना पडू लागला आहे. खरंतर नाशिकची ओळख म्हणजे मंदिरांची नगरी आहे. त्यामुळे भक्तिमय वातावरणात असलेलं शांत शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, 2023 उजाडल्यापासून नाशिक शहरातील गुन्हेगारी अधिकच वाढत चालली आहे. त्यामध्ये प्राणघातक हल्ल्याच्या सातत्याने वाढत असून भरदिवसा शहरात गोळीबार आणि कोयते घेऊन गुंडांकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकमधील गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

रविवारच्या दिवशी शहरात कार्बन नाका परिसरात एकावर हल्ला करण्यात आला त्यावेळी बंदूक आणि कोयत्याचा त्यामध्ये वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी पंचवटीमध्ये एकावर हल्ला करत असतांना गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये एक महिला आणि श्वान जखमी झाला होता.

त्यापूर्वी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग वाडीत दोन गटात दंगल झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले होते. याच आठवड्यात सातपुर येथे जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची घटना घडली होती.

हे सुद्धा वाचा

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत होळीच्या दिवशी एकावर चाकूने हल्ला केला होता. तर इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही जुन्या वादातून कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली होती. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर येथेही गाडी अंगावर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता.

त्यामुळे एकूण दहा दिवसांत सहा हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. तर अडीच महिण्यात 19 गंभीर गुन्हे घडल्याची नोंद नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झाली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी बोकाळली असून पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.