बहुचर्चित कापडणीस प्रकरणाची सुनावणी लवकरच, सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम यांचे वकीलपत्र; प्रकरण नेमकं काय?

बहुचर्चित कापडणीस पिता पुत्र खून प्रकरणी नाशिक न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम यांनी वकीलपत्र दाखल केले आहे.

बहुचर्चित कापडणीस प्रकरणाची सुनावणी लवकरच, सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम यांचे वकीलपत्र; प्रकरण नेमकं काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 7:59 AM

नाशिक : नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरून टाकणाऱ्या कापडणीस पिता-पुत्राच्या खून खटल्याला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये मे महिन्यांपासून या खून खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. सरकारी पक्षाकडून सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांनी वकीलपत्र नाशिक न्यायालयात सादर केले आहे. ॲड. उज्ज्वल निकम हे वकील मिळावे याकरिता नाशिकच्या पोलिस प्रमुखांनी गृह विभागाला याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिवांसह त्यांच्या डॉक्टर मुलाचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. सरकारवाडा पोलिस ठाण्यात आधी अपहरण त्यानंतर बाप लेकाचा खुनाचा गुन्हा आणि त्यांतर तब्बल चार जणांना पोलिसांनी अटक केली होती.

मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप आणि त्याचे इतर साथीदार प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोर यांना पोलिसांनी अटक केली होती. तपास करत असतांना पिता पुत्रांची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या हद्दीत टाकून दिले होते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे कठीण झाले होते.

सरकारवाडा पोलिस हद्दीत राहणारे कापडणीस यांच्या मोबाइलवर परदेशात राहणाऱ्या पत्नी आणि मुलीचा संपर्क होत नसल्याने त्यांनी नाशिक गाठलं होतं, मात्र त्यानंतरही कापडणीस पिता पुत्र सापडत नसल्याने मुलीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर पोलिसांनी तपास केला असतांना कापडणीस यांची संपत्ती लाटण्यासाठी खून केल्याचे समोर आले होते. स्वतः नानासाहेब कापडणीस म्हणूनच वावरत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याने केलेले डिमार्टचे व्यवहार यावरून राहुल जगताप पोलिसांच्या हाती लागला होता.

इतकंच काय नानासाहेब कापडणीस यांचा मोबाईल स्वतः वापरत असून अनेक ठिकाणी व्यवहार देखील सुरू केले होते. त्यात इमारतीचे बांधकाम सुरू असतांना त्याकडेही लक्ष देत होता.

हॉटेल सुरू करून नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा यांना जीवे ठार मारून कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपली होती. त्यातमध्ये आलेल्या पैशातून लाखो रुपयांची एक कार देखील खरेदी केली होती. ती कार एका सिने अभिनेत्याकडून खरेदी केल्याचे समोर आले होते.

त्यामुळे कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी रचेलला कट पाहून पोलिस सुद्धा चक्रावून गेले होते. आता त्या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार असून त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहणार असून सरकारवाडा पोलिसांनी दोषारोप पत्रही सादर केले आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.