नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरामध्ये भर दिवसा गोळीबार आणि कोणत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. चित्रपटाला लाजवेल अशा स्वरूपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेरा झाला होता आणि त्यानंतर हा धक्कदायक प्रकार समोर आला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली होती. पूर्ववैमन्यस्यातून ही घटना घडल्याचं नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र, या घटनेतील इतिहास पोलिसांनाही चक्रावून टाकणारा असून मुळशी पॅटर्न या चित्रपटातील काही दृश्यांना साजेस आहे. त्यामुळेच या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक दिवस यातील संशयित आरोपी फरार होते. त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना यश येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.
नाशिकच्या कार्बन नाका परिसरातील गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गेले अनेक दिवस संशयित आरोपी हाती लागत नव्हते. हल्ला झालेल्या तरुणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुण प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपन जाधव आणि राहुल पवार हे दोघे कार्बन नाका परिसरातून त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्याच वेळेला आशिष जाधव, भूषण पवार, रोहित अहिरराव, गणेश जाधव, किरण चव्हाण आणि सोमनाथ झांजर यांनी दुसऱ्या चारचाकी पाठलाग करत धडक दिली होती.
या धडकेनंतर तपन जाधव याणणे पळ काढला तर राहुल जाधव हा कारमध्ये होता. त्याच्यावर संशयित आरोपी यांनी गोली झाडली आणि त्यानंतर हातातील कोयत्याने वार केले होते. त्यानंतर भरदिवसा भर रस्त्यात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आशिष जाधव आणि फिर्यादी राहुल पवार हे दोघे सराईत गुन्हेगार आहे. दोन्ही जनामध्ये भावांच्या हत्येवरुण पुर्ववैमन्यस निर्माण झाले आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिस तपासात समोर आले असून शहर पोलिस अधिकचा तपास करत आहे.