Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅटरिंगचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले, मग परराज्यात नेत…, काय घडलं नेमकं?

कॅटरिंगच्या नोकरीचं आमिष दाखवत मुलीला नाशिकहून पुण्यात आणलं. मग पुढे मुलीसोबत जे घडलं ते भयंकर होतं. मात्र अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

कॅटरिंगचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले, मग परराज्यात नेत..., काय घडलं नेमकं?
नोकरीचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला विकलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 2:22 PM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : कॅटरिंगच्या कामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून परराज्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला 80 हजारात विकण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने हुशारी दाखवल्यामुळे तिची यातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी एका महिला एजंटसह एकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत. या माध्यमातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

काय आहे प्रकरण?

एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एका महिलेने तिला आळंदी येथे नेले. तिथे 80 हजारात तिचा सौदा करत हैदराबाद येथील तरुणाशी बळजबरीने विवाह लावला. त्यानंतर त्या मुलीस हैदराबाद या ठिकाणी नेऊन डांबून ठेवले. मुलीने मात्र हुशारी दाखवत ‘तुम्ही माझा घरी चला.. माझ्या घरच्यांना सांगा’ असं सांगत त्यांना घेऊन पुणे या ठिकाणी आली. त्या ठिकाणी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी तिला विचारणा केली. त्यावेळेस मुलीने परिस्थिती सांगितल्यानंतर पुण्याच्या नागरिकांनी मुलीच्या भावाशी संवाद साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तातडीने मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे मुलीने आपबिती सांगितली.

आरोपींना कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी

परराज्यात मुलीला नेत तिची विक्री करणे आणि लग्न लावून देणारे असे आणखी काही प्रकार या संशयितांनी केले आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यातून मुलींना विक्री करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या मुलीबाबत जे घडले ते इतर कोणासोबत घडू नये, यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.