मित्रांनी भेटीसाठी बोलावलं पण आधीच प्लॅन ठरला होता, बाचाबाची झाली आणि नंतर जे घडलंय ते भयंकर आहे, नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातील गुन्हेगारी फोफावत चालली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे विद्यार्थी दशेतील मुलंही गुन्हेगारी सारखं पाऊल उचलत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मित्रांनी भेटीसाठी बोलावलं पण आधीच प्लॅन ठरला होता, बाचाबाची झाली आणि नंतर जे घडलंय ते भयंकर आहे, नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:01 PM

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांची कंबर कसलेली असतांना शहरातील काठेगल्ली परिसरात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून शहरात पोलिस अधिकाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. यामध्ये शहरातील गुन्हेगारांना चांगलेच रडारवर घेतलेले असतांना द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पंचवीस वर्षीय तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला असून गुप्तीने वार केले आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सातपुर येथील आशुतोष भोसले हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये काही आशुतोष ला त्याच्या मित्रांनी संध्याकाळी भेटण्यासाठी काठे गल्लीत बोलावले होते. त्यावरून आशुतोष भेटायला आला होता. त्यावेळी आशुतोष सोबत मित्रांनी वाद घातला.

आशुतोषवर हल्ला करण्याचा आधीच कट रचून ठेवला होता. त्यामध्ये आशुतोषच्या दंडावर गुप्तीने वार करण्यात आले आहे. यामध्ये आशुतोष गंभीर जखमी झाला असतांना तो खाली पडला होता. नागरिकांनी तो पडलेला अवस्थेत पाहून पोलिसांना कळविले होते.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर सर्व तरुण पळून गेले होते. भद्रकाली पोलिसांनी याबाबत गुन्हा दखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे. या हल्ल्यातील संशयित आरोपीत अठरा वर्षाखालील मुलं असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगरी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाची दंडाची मोठी रक्तवाहिनी तुटली आहे. या घटनेने काठे गल्ली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असून अधिकचा तपास केला जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.