पोलिसांचा नाद नाही करायचा, आव्हान दिलं तर घरात घुसून उत्तर, गुन्हेगारांचे धाबे दणाणले…

| Updated on: Mar 29, 2023 | 7:48 AM

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी बघता पोलिसांनी मध्यरात्री संपूर्ण शहरात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

पोलिसांचा नाद नाही करायचा, आव्हान दिलं तर घरात घुसून उत्तर, गुन्हेगारांचे धाबे दणाणले...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : भरदिवसा गोळीबार आणि कोयता आणि तलवारीचा वापर करत हल्ला, घरफोडी, मारहाण अशा विविध घटना शहर हद्दीत घडत आहे. त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांचे मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा वचक राहिला नाही का अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली होती. त्यात नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही लोकप्रतिनिधींनी शहरातील गुन्हेगारीवरुन प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सुस्तावलेल्या पोलिसांमध्ये काही बदल होईल अशी स्थिती असतांना त्यात काहीही बदल झाला नव्हता. शहर पोलिस ठाण्यात गुन्हे घडतच होते.

सातपुर परिसरात भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला, अंबड परिसरात कोयत्याने हल्ला, पोलिस आयुक्त कार्यालयाच्या समोरच हातात कोयता घेऊन राडा, पंचवटीत गोळीबार महिला आणि श्वान जखमी अशा विविध घटना शहरात घडतच होत्या.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बघता पोलिसांचा वचक राहिला नाही, आरोपी पकडण्यातही पोलिसांना यश येत नव्हते त्यामुळे पोलिस टीकेची धनी झाले होते. कामगिरीवर प्रश्न उपस्थित करून नागरिक नाराजी व्यक्त करत होते.

हे सुद्धा वाचा

हीच सर्व परिस्थिती पाहून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला होता.

एकंदरीतच पोलिसांनी या पत्राचा धसका घेतला की की सोमवार आणि मंगळवार असे दोन्ही दिवस शहरात रात्रीची वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये थेट पोलिस उपायुक्त रस्त्यावर उतरून कारवाई करत होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळेला रस्त्यावर पाहायला मिळाला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगारांची तपासणी. हिस्ट्रीशीटर, तडीपारांची तपासणी, टवाळखोरांवरील कारवाई, अजामिनपात्र वॉरंट कारवाई आणि हत्यारधारी संशयित यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

थेट घरापर्यंत घुसून शहरातील पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले असून पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे अनेक रात्रीच्या वेळेल्या करण्यात आलेल्या या कारवाईने पोलिस रस्त्यावर असल्याचा इशारा ही गुन्हेगारांना दिला गेला आहे.