नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामध्ये नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला अटक केली आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर डगळे याला सात हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अपहरणाच्या गुन्ह्यातील चार्जशिट बदलण्यासाठी सागर डगळे याने 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोडी अंती दहा हजार रुपयांवर रक्कम ठरल्यानंतर सात हजार रुपये घेत असतांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात हा संपूर्ण प्रकार घडल्याने संपूर्ण नाशिक शहरासह पोलिस दलात उलट सुलट चर्चा सुरू आहे. खरंतर लाच घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकू नये यासाठी डगळे याने अनेक ठिकाणं बदलली होती.
त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी लाच घेतांना एसीबीने कारवाई केली आहे. यामधील विशेष बाब म्हणजे सागर डगळे याला 2022 मध्ये पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच डगळे हा विशेष सुरक्षा विभागात त्याची निवड झाली होती.
त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रतीनियुक्तीचे आदेश नसल्याने तो उपनगर पोलिस ठाण्यातच कार्यरत होता. लाचखोर सागर डगळे याच्याकडे उपनगर पोलिस ठाण्यातील प्रेमप्रकरण आणि त्यानंतर अपहरणाचा दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास होता.
त्यामध्ये संशयित आरोपीच्या भावाला देखील यामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनावर सुटला होता. त्यानंतर त्याच प्रकरणी सागर डगळे याने चार्जशिट मध्ये बदल करून देतो म्हणून 25 हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्यादरम्यान ही कारवाई झाली आहे.
तक्रारदार याला लाचखोर डगळे याने अनेक ठिकाणी फिरवले. सुरुवातीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले. त्यानंतर रेल्वेस्टेशन येथे बोलावले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात बोलावले अखेरच्या ठिकाणी त्याची भेट झाली. त्याच दरम्यान लाच घेत असतांना दबा धरून बसलेल्या एसीबीने छापा टाकला.