लाचेची हाव काही जाईना, निवृत्तीची लगबग आणि दुसरीकडे लाच घेताना रंगेहाथ अटक, दोन दिवसांत ACB ची मोठी कारवाई
दोन दिवसांत दोन बड्या अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे निवृत्त होत असतांनाही लाच स्वीकारल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : शेतकरी संकटात असतांना कृषी अधिकाऱ्याने उद्योजकाकडून लाच घेतांना अटक केल्याने संताप व्यक्त केला जात असताना सिन्नरच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला घरी लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. सिन्नर मधीलच दोन्ही अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आत लाच घेतांना अटक केल्याने उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. खरंतर अवकाळी पाऊसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्याला मानसिक पाठबळ देऊन पंचनामा करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती तोच अधिकारी लाच घेतांना अटक केल्याने संताप व्यक्त केला जात होता.
कृषी अधिकाऱ्यांला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केल्यानंतर संताप व्यक्त केला जात असतांना दुसरी लाच घेण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 24 तासाच्या आतच ही घटना घडली आहे.
दुसऱ्या घटनेतील विशेष बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्याने ही लाच घेतली त्याच्या निवृत्तीची लगबग सर्वत्र सुरू असताना त्याने राहत्या घरी रो हाऊस ला परवानगी देण्यासाठी सहा महीने पडून असलेली फाइल मंजूर करण्यासाठी लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.




सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे याला अटक करण्यात आली होती. तर आता नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय महादेव केदार यांना पाच हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाच रो हाऊसची फाइल मंजूर करण्यासाठी सहा महीने चकरा मारूनही फाइल मंजूर होत नसल्याने लाच मागितली होती. त्यानुसार एक हजार रुपये प्रमाणे पाच रो हाऊस चे पाच हजार रुपयांची लाच घेतांना नाशिकमध्ये अटक झाली आहे.
सिन्नर मध्ये दोन दिवसांत दोन लाच घेण्याऱ्या अधिकाऱ्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे निवृत्तीची लगबग सुरू असतांनाही लाचेची हाव जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.