डिझेल चोरीचा बिहार पॅटर्न, पोलिसांच्या सापाळ्यात अडकली टोळी; डिझेल चोरीचं प्रकरण पाहून पोलिसही चक्रावले

बिहार सारख्या राज्यामध्ये ट्रक मधून डिझेल चोरी करण्याचे प्रकार समोर आले होते. त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये डिझेल चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

डिझेल चोरीचा बिहार पॅटर्न, पोलिसांच्या सापाळ्यात अडकली टोळी; डिझेल चोरीचं प्रकरण पाहून पोलिसही चक्रावले
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:58 AM

नाशिक : अनेक ठिकाणी डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र नुकतीच नाशिकमध्ये लासलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून खळबळ उडाली आहे. यामध्ये बिहारमध्ये काही वर्षांपूर्वी डिझेल चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामध्ये अवघ्या काही मिनिटांत डिझेल चोरी करण्याचं कसबं त्या चोरट्यांकडे होतं. अगदी तसंच काहीशी चोरी नाशिकच्या विविध भागात होत होती. चोरटे फक्त डिझेल चोरी करून धूम ठोकत होते. उभ्या असलेल्या ट्रकमधून ही चोरी केली जात होती. त्यामुळे ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे डिझेल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात होती. मात्र कारवाई होत नव्हती.

मात्र, नुकतीच डिझेल करणारी टोळी नाशिकच्या लासलगाव पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये गस्तीवर असेलेल्या पोलिसांना संशयित कार फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला होता.

स्कोडा कारमध्ये असलेल्या चौघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे पोलिसांचा संशय खरा ठरला. यामध्ये डिझेलचे बॅरल तिथे आढळून आले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान ट्रक मधुन डिजेलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत जेरबंद केले आहे. या कारवाईत स्कोडा चारचाकी गाडीसह तीन लाख रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर बिहार मध्ये अशाच स्वरूपात ट्रकमधून डिझेल चोरी करण्याची पद्धत समोर आली होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केली जात होती. त्यानंतर तसे नाशिकमध्ये घडत आहे.

विशेष म्हणजे याबाबत तक्रारदार सुद्धा बिहार येथीलच असून लासलगाव पोलिसांच्या तपासात जिल्ह्यातील डिझेल चोरीच्या टोळीने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिझेळ चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यामध्ये अजय मिथुन शिंदे, शिवाजी सदाशिव आणि यशवंत सदाशिव मालखेडे यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सौरभ राजेंद्र अहिरे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.