लग्नाला आले नाही म्हणून संताप अनावर झाला, मग पत्नीसह दोन्ही मुलांनी जे केलं त्याने संपूर्ण नाशिक हादरलं!
लग्नाला न आल्यावरून संताप अनावर झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या किंवा पहिल्या असतील पण नाशिकमध्ये अशी एक घटना घडलीय त्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसही चक्रावले आहे.
नाशिक : लग्न म्हंटलं की रूसवे-फुगवे आलेच. या रूसव्या फुगव्यामुळे अनेकदा अबोला धरला जातो. वर्षे वर्षे कुणी कुणाशी बोलत नाही. कुणीतर थेट संपर्कच तोडून टाकतात. काही जण तर टोमणे मारतात किंवा वादही घालतात. काही ठिकाणी वाद होऊन हाणामारी ( Crime News ) सुद्धा झाली आहे. पण नाशिकच्या चांदवड पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्हीच काय पोलिस सुद्धा चक्रावून गेले आहे. पुतणीच्या लग्नाला आले नाही म्हणून असा काही प्रकार समोर आला आहे ज्याने चांदवडच नाही संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चांदवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या चांदवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंदलगाव म्हणून एक गाव आहे. मनमाड ते मालेगाव या मार्गावर हे गाव आहे. म्हसोबा देवस्थान म्हणून कुंदलगाव प्रसिद्ध गाव आहे. याच गावात घडलेली घटना वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली आहे.
पूनमचंद शिवाजी पवार यांच्या पुतणीचा नुकताच लग्न सोहळा झाला होता. या लग्न सोहळ्यात पूनमचंद पवार यांचे संपूर्ण कुटुंब होते. यामध्ये पूनमचंद यांच्या पत्नी सुनिता यांच्यासह भूषण आणि कृष्णा ही दोन्ही मुलेही लग्नाला उपस्थित होते.
याच वेळी पूनमचंद मात्र लग्नाला उपस्थित राहिले नाही. घरातील लग्न असतांना पूनमचंद उपस्थित न राहिल्याने त्यांच्या पत्नीसह मुलांना लग्नात विचारणा होऊ लागली होती. पूनमचंद नाही म्हणून अनेकदा चौकशी झाली पण त्यांचा थांगपत्ताच लागेना.
पूनमचंद यांचे घरातील लग्न असतांना अनुपस्थित असणं हे पत्नीसह मुलांना खटकलं. नंतर जेव्हा पूनमचंद घरी आले तेव्हा पत्नी आणि मुलांनी त्यांना जबर मारहाण केली. हात आणि पायावर बेदम मारहाण केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर मुलांचा ही बाब लक्षात आल्याने त्यांचे चुलते म्हणजेच पूनमचंद यांचे भाऊ भावराव यांना बोलविले होते.
भावराव यांनी भावाची परिस्थिती पाहताच डॉक्टर घेऊन चला म्हणून सांगितले. पण तो पर्यन्त पूनमचंद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर खून झाल्याचं उघडकीस आले. त्यानंतर भावराव यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यामध्ये पूनमचंद यांचा खून पत्नी आणि दोन्ही मुलांनी केल्याचे उघडकीस आले आणि त्यानंतर चांदवड पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. यामध्ये पुतणीच्या लग्नाला आले नाही म्हणून मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे.