महिला शेजारी बसल्या म्हणून त्याने विश्वास ठेवला आणि इथेच घात झाला, चोरीचा फंडा पाहून पोलिसही चक्रावले…

बँकेत गेल्यास तुम्ही विशेष काळजी घ्या अन्यथा तुम्हाला बसू शकतो गंडा, नुकताच एक नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

महिला शेजारी बसल्या म्हणून त्याने विश्वास ठेवला आणि इथेच घात झाला, चोरीचा फंडा पाहून पोलिसही चक्रावले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:18 PM

नाशिक : चोरी करण्यासाठी खरंतर चोरटे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यामुळे ते कधी यशस्वी होतात तर कधी अपयशी ठरतात. मात्र, नंतर चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या हातीही लागतात. त्यावेळेला चोरीचा  ( Crime News ) प्रकार पाहून अनेकदा पोलिसही चक्रावून जातात. त्यात महिलांनी जर चोरी केलेली असेल तर मग त्याची अधिकच चर्चा होते. त्यात आता बँकेत पैसे भरतांना काळजी घ्या असं आवाहन नाशिक शहर पोलिसांना करण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बँकेत चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमधून उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये बॅंकेचे अधिकारी सुद्धा या चोरीच्या घटनेने धास्तावले आहे.

नाशिकमध्ये बँकेत पैसे भरतांना काळजी घ्या असे आवाहन करत पैसे चोरी करणाऱ्या महिला दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करीत आहे. त्याचे कारण म्हणजे बँकेत पैसे भरण्यास गेलेल्या व्यक्तीच्या बॅगेतून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

महिला चोरांची टोळी कार्यरत असल्याची बाब समोर आली आऊन बँकेत या महिला सक्रीय असल्याचे आढळून आले आहे. पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या शेजारी महिला बसून राहतात. ग्राहक सही करण्यासाठी किंवा काही कारणासाठी उठताच हातचलाखीने रोकड काढून घेतात.

असाच प्रकार अंबड येथील एका बँकेत घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. सही करण्यासाठी उठलेल्या ग्राहकाची 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली असून ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

बँकेत सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात. याची कुठलीही भीती न बाळगता महिला चोरी करत असल्याचे समोर आल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा धास्तावले आहे. बँकेत सर्रासपणे अशा चोरीच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून अंबड पोलिस महिलांचा शोध घेत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.