रेल्वे स्थानकावर ते लक्ष ठेवून राहतात, ‘ती’ व्यक्ती दिसली की पाठलाग करतात; आणि हप्ता घेण्यासाठी…
इगतपुरी पोलिस गस्तीवर असतांना त्यांच्या निदर्शनास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली असून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
नाशिक : रेल्वेमध्ये अनेक तृतीयपंथी हे पैसे मागून आपलं आयुष्य जगत असतात. अनेकदा काहींना भरभरून पैसे मिळतात तर काहींना पैसे मिळत नाही. पण याच तृतीयपंथीयांच्या पैशांवर काहींचा डोळा आहे. त्याबाबतचं रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या इगतपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन ही बाब समोर आली आहे. तृतीयपंथीयांच्या पैशावर डोळा असलेल्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक जण फरार आहे. इगतपुरी बसस्थानकाच्या बाहेर बसलेल्या तृतीयपंथीयांना शस्राचा धाक दाखवून हप्ता वसूल करण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबईवरुन निघालेल्या रेल्वेत अनेक तृतीयपंथी पैसे मागून इगतपुरी येथे उतरून घेतात. आणि पुन्हा इगतपुरी येथून मुंबईकडे पैसे मागत जातात. याच तृतीयपंथीयांना इगतपुरी येथील स्थानिकांनी त्यांच्याकडून हप्ता वसूली सुरू केली आहे.
तृतीयपंथी उतरल्यावर त्यांच्याकडून पैसे मागणारे काही तरुण असतात. त्यांनी पैसे दिले नाही की त्यांना शस्राचा धाक दाखविला जातो. असं रॅकेटचं असल्याचे बोलले जात आहे.
तृतीयपंथीयांना काही तरुण पैसे जो पर्यन्त देत नाही तोपर्यंत सोडत नाही. पैसे देण्यासाठी शस्राचा धाक दाखवतात. असा प्रकार सुरू असतांना इगतपुरीचे पोलिस निरीक्षक आणि त्यांचे काही सहकारी गस्त घालत होते.
त्याच दरम्यान ही झटापट सुरू होती. पोलिसांना पाहताच हप्ते वसूल करणाऱ्यांनी धूम ठोकली. तृतीयपंथीयांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली त्यांनी हकिगत सांगितल्यावर पोलिसांनी तरुणांचा पाठलाग सुरू केला.
यामध्ये सूरज गोपीचंद भंडारी, गोपीचंद काशीनाथ भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुगंधा परशुराम गायकवाड यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये तक्रारदार हे मुंबईतील आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे दोन्ही संशयित आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील आहे. यामध्ये एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सखोल तपास करून तृतीयपंथीयांना लुटणारी टोळी सापडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.