तरुणाला मृत्यू खुणावत होता, उपचारासाठी जातांनाच घडली दुर्दैवी घटना, जन्मदात्या आईच्या खांद्यावरच…
नाशिक जिल्ह्यातील सोनांबे गावात घडेलया हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
नाशिक : नियतीपुढे कुणाचेही काही चालत नाही असे म्हणतात. मात्र, अनेकदा प्रयत्न केले तर नियतीलाही झुकावे लागतं असं म्हंटलं जातं. पण याच काळात केला जाणारा संघर्ष मात्र अनेकांच्या मनात घर करून राहतो. नाशिकच्या सिन्नरमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल शिरसाठ नावाचा 30 वर्षीय तरुण आपल्या आईसोबत राहत होता. सिन्नरच्या सोनांबे गावात दोघे राहत होते. अचानक अमोलच्या पोटात अचानक दुखू लागले म्हणून आईने अमोल चे काका यांना बोलावून घेत सिन्नरला दवाखान्यात घेऊन चला म्हणून सांगितले होते.
काका संजय शिंदे दुचाकी चालवायला स्वतः बसले. मध्ये अमोलला बसविले आणि मागे आई बसली. सोनांबे गावावरुन दुचाकी सिन्नरच्या दिशेने निघाली होती. अमोलच्या पोटात भयंकर त्रास होत होता. आई धीर देत होती. डॉक्टरकडे गेल्यावर बरं वाटेल म्हणून सांगत होती.
मात्र, हे सांगत असतांना अमोलला हृदय विकाराचा झटका आला. पाठीमागे बसलेल्या आईने धीर सोडला नाही. आपल्या मुलांना घट्ट पकडून ठेवले. पुढे काका गाडी चालवत होते. अमोलने जीव सोडला ही बाब लक्षात येऊनही आईने धीर सोडला नव्हता.
सिन्नरमधील डॉक्टरकडे अमोलला उपचारासाठी दाखल करणार त्यापूर्वी डॉक्टरांनी तपासणी केली. त्यात अमोलचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी सांगितली. आईने तिथेच हंबरडा फोडला. एकट्या आईला अमोल सोडून गेल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
अमोल हा सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करत होता. त्यावर अमोल आणि आईचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, एकट्या आईला अमोल सोडून गेल्याने आईला मोठा धक्का बसला आहे. हा संपूर्ण प्रसंग ऐकून अनेकांच्या डोळ्यातून अश्रुधारा थांबत नाहीये.