नाशिकचे 50 पोलीस मुंबईत जाऊन घेणार खास प्रशिक्षण, मुंबईचा कोणता पॅटर्न नाशकात ?
मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागामध्ये वाहुतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
नाशिक : नाशिक शहर पोलीस दलातील पन्नास पोलीस मुंबई पोलिसांकडे धडे घेण्यासाठी जाणार आहे. याबाबतची माहिती नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरातील हे पन्नास पोलीस मुंबईतील वाहतुक व्यवस्थेबाबत धडे घेणार आहे. मुंबईतील वाहतुक व्यवस्था कशी सुस्थितीत ठेवतात याचे प्रशिक्षण नाशिकचे पन्नास पोलीस घेणार आहे. नाशिक शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली असतांना त्याची विविध कारणे आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांना याबाबत काही मर्यादा आहेत. त्यामुळे हा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिकचे पन्नास पोलीस प्रशिक्षण घेऊन शहरातील पोलिसांना प्रशिक्षण देणार आहेत. वाहतुक व्यवस्था सुरळीत करणेसाठी शहर पोलीस कटिबद्ध असून मुंबईमध्ये लवकरच प्रशिक्षण घेऊन मुंबईला जाणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे.
नाशिकमधील शालिमार चौक, रविवार कारंजा, मुंबई नाका, द्वारका, सारडा सर्कल येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते.
एकीकडे शहरातील ब्लॅकस्पॉट संदर्भात ठोस उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे.
शहरातील कुठे उड्डाणपूलाची आवश्यकता आहे, कुठे भुयारी मार्ग असायला हवे याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
शहर पोलिसांकडून याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव देण्यात आला असून पालिका आयुक्त आणि आरटीओ यांच्यासोबत चर्चा केली जात आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागामध्ये वाहुतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.