झाडाला तरुणाचा मृतदेह लटकतोय, लोकांची गर्दी पाहून पोलिसांना घाम फुटला, पाच तास लागले…

पुणे नाशिक महामार्गावर एका तरुणाचा मृतदेह लटकत होता. त्याची हत्या की आत्महत्या हे पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. त्यावेळी पोलिसांनी तिथून वाहतूक सुरळीत करीत असताना घाम फुटला.

झाडाला तरुणाचा मृतदेह लटकतोय, लोकांची गर्दी पाहून पोलिसांना घाम फुटला, पाच तास लागले...
kalyan crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 8:31 AM

सुनिल जाधव, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन, पत्रिपुल रेल्वे परिसरात (Kalyan news) तरुणाचा मृतदेह असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झाडाला रशीने लटकलेला मृतदेह असल्यामुळे लोकांनी तिथं तोबा गर्दी केली. विशेष म्हणजे तो परिसर पुणे नाशिक महामार्गावर (nashik pune highway)लागून असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची मोठी गर्दी झाली होती. काल तिथं रात्रीच्या दरम्यान पोलिसांना मोठी गर्दी पाहायला मिळाली. पोलिसांनी (kalyan crime news in marathi) तिथली गर्दी पांगवताना अधिक त्रास झाला. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नेमकं काय झालं

कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पत्रीपूल रेल्वे ट्रॅक परिसरात काल रात्री उशिरा एका 25 वर्षीय तरुणांचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी कल्याण पत्रीपूल परिसरात गर्दी केल्याने पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोळसेसाडी वाहतूक पोलिसांना तब्बल पाच तास तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीच्या वेळेला अवजड वाहनही या मार्गावरून जात असल्याने वाहतूक पोलिसांचा चांगलाच घाम निघाला. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

हत्या की आत्महत्या ?

तरुणाची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. त्या तरुणाचा मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे. लोकांनी पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की, पाच तिथं गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पाच तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.