तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून दिले विहिरीत ढकलून त्यानंतर… सिन्नर तालुका हादरला

नाशिकमधील सिन्नर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका गावामधील तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

तीन चिमुकल्यांना कासव दाखवतो म्हणून दिले विहिरीत ढकलून त्यानंतर... सिन्नर तालुका हादरला
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 5:28 PM

नाशिकमधील सिन्नर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान चिमुकल्यांना ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळे येथे घटना घडली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अधिकचा तपास सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. अथर्व घुगे, वरद घुगे आणि आदित्य सानप अशी चिमुकल्यांची नावे आहेत. त्यावेळी तिथे असलेल्या अमोल लांडगे याने मुलांना विहिरीमधील कासव असल्याचं सांगत ते दाखवण्यासाठी विहिरीजवळ नेलं. तिथेच संशयित विक्रम माळी, साईनाथ ठमके आणि अमोल यांनी भरलेल्या विहिरीमध्ये तिन्ही मुलांना ढकलून दिले आणि तिथून पलायन केले.

मुलांमधी एकाने विहिरीतील मोटारीच्या दोरीला पकडलं आणि बाहेर येऊन इतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. सुरूवातील तिघांनीही घरी काही सांगितलं नाही. ओल्या झालेल्या कपड्यांमुळे घरच्यांना संशय आला आणि मुलांना विश्वासात घेत त्यांनी काय झालं याबद्दल विचारल्यावर मुलांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अमोल लांडगे याला ताब्यात घेतलं असून दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीने मुलांना मारण्याचा प्रयत्न का केला?  त्यांना मारण्याचा आरोपीचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने खळबळ  उडाली असून गावात याची जोरदार चर्चा असून पोलीस संशयितांच्या मागावर आहेत.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.