Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती मोहीम अधिक तीव्र; अन्यथा हे भोगावे लागतील परिणाम!

शहरात ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती केली. तिचे स्वरूप ही वारंवार बदलले. मात्र, तरीही नागरिक बधत नाहीत. नियम पाळत नाहीत. त्यामुळे शहरात आजपासून हेल्मेटसक्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

Nashik | नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती मोहीम अधिक तीव्र; अन्यथा हे भोगावे लागतील परिणाम!
नाशिकमध्ये आता कडक हेल्मेटसक्ती सुरू होतेय.
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:46 AM

नाशिकः नाशिकमध्ये एकामागोमाग एक होणारे अपघात, त्यात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचा जाणारा जीव पाहून पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) अधिक आक्रमक झालेत. त्यांनी शहरात आजपासून तीव्र हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट ठेवावेच. अन्यथा तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो.

ऑगस्टपासून मोहीम सुरू

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली.

दुचाकीस्वारांचे समुपदेशन

हेल्मेटसक्ती मोहिमेत दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली. शेवटचा उपाय म्हणून नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. 8 नोव्हेंबरपासून हे आदेश लागू करण्यात आले. त्यानंतरही अनेक कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकी चालकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळेच दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी अशोक हिरे आणि एचपीटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलीस अधिनियम कलम 131 ब (1) अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. येणाऱ्या काळात ही कारवाई तीव्र करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आता हजाराचा दंड अन् परवानाही रद्द

शहरात ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती केली. तिचे स्वरूप ही वारंवार बदलले. मात्र, तरीही नागरिक बधत नाहीत. नियम पाळत नाहीत. त्यामुळे शहरात आजपासून हेल्मेटसक्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार दुचाकीचालक पहिल्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तो दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास 1000 रुपये दंड तर ठोठावला जाईलच. सोबत त्या चालकाचा वाहन परवानाही रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा चांगलाच भुर्दंड बसू शकतो.

‘त्या’ 111 जणांचा मृत्यू

– नाशिकमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये 116 दुचाकी अपघात.

– या अपघातामध्ये तब्बल 124 जणांचा झाला मृत्यू.

– मृतातील 111 जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते.

– ऑगस्ट महिन्यात 9 जणांचा मृत्यू.

– ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली.

– नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष अभियान राबवले गेले.

– अभियानात तब्बल 10 हजार 561 दुचाकीस्वारांचे समुपदेशन.

इतर बातम्याः

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?

Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.