Nashik| गोदा किनारी अनधिकृत बंगलो, नदीपात्रात टोलेजंग बांधकाम; बिल्डरने ऐनवेळी नकाशाच बदलला!

नाशिकमध्ये गोदापात्रात बांधकाम सुरू असल्याचा प्रश्न नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत उपस्थित केला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

Nashik| गोदा किनारी अनधिकृत बंगलो, नदीपात्रात टोलेजंग बांधकाम; बिल्डरने ऐनवेळी नकाशाच बदलला!
Mayor inspects unauthorized constructions in Godavari river basin
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 1:21 PM

नाशिकः महापुराचे धक्क्यावर धक्के बसूनही नाशिककर सावध होताना दिसत नाहीयत. आता तर बिल्डर मंडळींनी चक्क गोदापात्रात (Godavari) बांधकाम सुरू केले आहे, अशी तक्रार दुसरीतिसरी कोणी नव्हे, तर चक्क नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे महापौरही दक्ष झालेत. त्यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, गोदापात्रात बांधकाम सुरू असताना महापालिका (Municipal Corporation) प्रशासन आणि कारभारी काय करत होते, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण गाजण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, याप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

महासभेत प्रश्न उपस्थित

नाशिकमध्ये गोदापात्रात बांधकाम सुरू असल्याचा प्रश्न नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत उपस्थित केला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याची तातडीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी दखल घेतली. त्यांनी गोदापात्रातील या वादग्रस्त बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, महापालिकेत नगरसेवकांनी याबाबतप्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पाहणी केली. आता या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वसामान्यांना आणि बिल्डरला वेगळा न्याय असे होऊ देणार नाही. याप्रकरणी कारवाईच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थपूर्ण संबंधातून

गोदापात्रातील या बांधकामाला नगररचना विभागाला जबाबदार धरले जात आहे. या विभागातील काहींशी बिल्डरांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने अशी बांधकामे मोकाटपणे सुरू आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी स्थायी समितीतही लावून धरला होता.

पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार करणार

सलीम शेख यांनी महासभेतही त्यांनी हा प्रश्न लावून धरला. त्यानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय महापालिकेकडे संबंधित बिल्डरने सादर केलेला बांधकाम नकाशा आणि सध्या होणारे बांधकाम वेगळे आहे. हा नकाशा आपल्याकडे आहे. त्यामुळे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांनी याप्रकरणी पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्याः

Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!

Nashik | निवडणुकीत तेरावा; 159 झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी सर्वपक्षीय खटाटोप, पुढे काय होणार?

Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.