Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. (Nashik Man friendship Friend)

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या
नवी मुंबईतील तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 8:13 AM

नवी मुंबई : मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या तरुणाची इर्षेतून हत्या करण्यात आली. नवी मुंबईत घडलेल्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घणसोली भागातील झाडीत टाकला होता. (Nashik Youth kills Man for friendship with Female Friend)

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा

नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.

पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून अनिलचा मृतदेह पडून होता. अनिकेतची मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

19 वर्षांचा आरोपी अनिकेत जाधव हा पूर्वी नवी मुंबईतील तळवली परिसरात राहत होता. त्यावेळी एका तरुणीसोबत त्याची मैत्री होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात तो गावी गेला आणि दोघांमध्ये अंतर निर्माण झालं.

दरम्यानच्या काळात मयत तरुण अनिल शिंदेची त्या मुलीसोबत मैत्री झाली. दोघांमधील वाढती जवळीक अनिकेतच्या डोळ्यात सलत होती. त्याने आपल्या मित्रासह नवी मुंबईला येऊन अनिलचा काटा काढायचं ठरवलं. घणसोलीत येऊन त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाइलवरून अनिलशी संपर्क साधला. भेटून त्याला दारु पाजल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या केली होती.

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

उत्तर प्रदेशात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेने प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 16 सप्टेंबर 2020 रोजी बाराबंकी जिल्ह्यातील नाल्यात पवनकुमारचा मृतदेह आढळला होता.

पवनकुमारचा भाऊ लवलेश बहादूर सिंहच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. मयत पवनच्या पत्नीचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महिलेची कसून चौकशी केली असता तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कबुली पोलिसांना दिली.

संबंधित बातम्या :

‘जीवनसाथी’वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा

इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

(Nashik Youth kills Man for friendship with Female Friend)
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.