दुकानदाराचा हलगर्जीपणा लहान मुलाच्या जीवावर बेतला, विजेचा धक्का लागून अवघ्या 10 मिनिटात मृत्यू
दुकानदाराचा हलगर्जीपणा एका लहान मुलाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये घडलीय. Navi Mumbai children died
नवी मुंबई: दुकानदाराचा हलगर्जीपणा एका लहान मुलाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये घडलीय. विजेचा धक्का लागून मुलाचा जागीच मृत्यू झाला. असून मुलाच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात असून पोलीसांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. (Navi Mumbai children died due to electric current caused Shopkeepers carelessness)
11 हजार व्होल्टच्या धक्क्यानं मुलाचा जागीच मृत्यू
नवी मुंबईत ऐरोली येथील शिवशंकर प्लाझा 2 येथील इमारतीच्या बाहेर लेन्सकार्ट दुकानासमोर कामानिमित्त लोखंडी परांची ठेवण्यात आली होती. त्या परांचीची तिची उंची सुमारे 25 फुटाहुन अधिक असल्याने वरून जाणाऱ्या विद्युत मेन लाईनला परांची चिटकली होती. त्या परांचीमध्ये करंट उतरला आणि तेथील सिग्नल वर पिशव्या विकणाऱ्या एका लहान मुलाला 11 हजार व्होल्ट विद्युत शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा विजेचा झटका इतका भयानक होता की, 10 मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक झाले.
विनापरवानगी काम
सदर घटना सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सकाळी 8.30 वाजता घडली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन व एमएसइबी चे कर्मचारी हजर झाले. यामध्ये शिवशंकर प्लाझा 2 मधील लेन्स कार्ट व पीटर इंग्लंड या शॉपच्या रीपेरिंगचे काम सुरू असल्याचे समजले. सोसायटीने काम करण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेतल्याचे एमएसइबी चे अधिकारी यांनी सांगितले.
सदर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबीचे अधिकारी यांनी सांगितले तर रवाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करुन अधिक तपस करण्यात येत आहे.
Breaking : मुंबईतील एमएमआर रिजमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://t.co/clsRjBhHEd @advanilparab @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @BhatkhalkarA @mnsadhikrut @BJP4Maharashtra #RickshawandTaxi #PriceHike #PetrolDisel
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या:
तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
PMOच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आणि सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई पोलिसांची कामगिरी
(Navi Mumbai children died due to electric current caused Shopkeepers carelessness)