काय दिवस आलेत…? मिठाई खाल्ली म्हणून थेट मर्डर

काही दिवसांपूर्वी उधारीचे पैसे मागितले म्हणून मुंबईत एका ग्राहकाने चहा स्टॉलच्या दुकानदारावर थेट भांडच फेकून मारलं होतं. उकळता चहा अंगावर पडल्याने तो इसम जखमी झाला होता. हे कमी की काय म्हणून आता नवी मुंबईत एक भयाकन घटना घडली आहे.

काय दिवस आलेत...? मिठाई खाल्ली म्हणून थेट मर्डर
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:07 PM

चोरी, दरोडा, विनयभंग, अत्याचार, खून अशा अनेक गुन्ह्यांच्या घटनांनी राज्यात सध्या प्रचंड गदारोळ माजला आहे. शुल्लक कारमावरून लोकं एकमेकांचा जीवाच्या उठतात. काही दिवसांपूर्वी उधारीचे पैसे मागितले म्हणून मुंबईत एका ग्राहकाने चहा स्टॉलच्या दुकानदारावर थेट भांडच फेकून मारलं होतं. उकळता चहा अंगावर पडल्याने तो इसम जखमी झाला होता. हे कमी की काय म्हणून आता नवी मुंबईत एक भयाकन घटना घडली आहे. न विचारता दुकानातील मिठाई खाल्ल्याने दुकानदाराने ग्राहकाला एवढी बेदम मारहाण केली की त्यात त्या व्यक्तीचा मृत्यूच झाला. रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला असून लोखंडी पाईपने मारहाण केल्याने ग्राहकाने जीव गमावला. जुईल खान असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.आरोपी दुकनदार अनिल कुमार तसेच सुरशिंग जबदा आणि सुरेश जाबर या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील रबाळे येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. जुईल खान हा रबाळे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत,एका दुकानात पाण्याची बाटली आणायला गेला होता. तेव्हा त्याने त्या दुकानाच्या मालकाला न विचारताच समोर ठेवलेल्या डब्यात हात घातला आणि त्यातील मिठाई खाल्ली. ते पाहून दुकानदार अनिल कुमार यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी जुईल खान याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. बघता बघता त्यांचा वाद वाद प्रचंड वाढला. तेव्हा जुईल कुमार यांनी त्याचे दोन साथीदार सुरशिंग जबदा आणि सुरेश जाबर यांना तेथे बोलावलं. त्या तिघांनी मिळून रागाच्या भरात जुईल खानला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली, तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला आणि तेथेच खाली कोसळला. या घटनेते त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जुईल खानचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर दुकानदार अनिल कुमार व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.