आधी तरुणाची आत्महत्या, नंतर प्रेमिकेने घेतली खाडीत उडी, नवी मुंबईत नेमकं काय घडलं ?

प्रेमाचा अव्हेर केल्यामुळे नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने वाशी येथील खाडीपुलावरून थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. सुदैवाने तरुणीने उडी घेतल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी तिला वेळीच पाण्याच्या बाहेर काढले.

आधी तरुणाची आत्महत्या, नंतर प्रेमिकेने घेतली खाडीत उडी, नवी मुंबईत नेमकं काय घडलं ?
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 9:33 AM

नवी मुंबई  : प्रेमाचा अव्हेर केल्यामुळे नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने वाशी येथील खाडीपुलावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. सुदैवाने तरुणीने उडी घेतल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी तिला वेळीच पाण्याच्या बाहेर काढले. तरुणीच्या शरीरात पाणी गेल्यामुळे तिच्यावर मनपा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी तीन दिवसांपूर्वी तरुणी प्रेम करत असलेल्या एका तरुणानेदेखील स्वत:ला संपवलं होतं.

तरुणाने नकार दिल्याने घेतली उडी, सुदैवाने जीव वाचला 

मिळालेल्या माहितीनुसार चार जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता वाशी येथील खाडीपुलावरून एका तरुणीने अचानकपणे उडी घेतली. प्रेमीने प्रेमाला होकार दिला नसल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने खाडीत उडी घेताच हा प्रकार स्थानिक मच्छिमारांच्या लक्षात आला. त्यानंतर मच्छिमार तसेच पोलिसांनी या तरुणीला वाचवण्यासाठी धाव घेतली. मच्छिमार महेश सुतार, पोलीस हवालदार नाईकवाडी, घुले, दराडे, वीरकर आदींनी या तरुणीचा जीव वाचवला.

शरीरात पाणी गेल्याने तरुणीवर रुग्णालयात उपचार 

तरुणीला खाडीच्या बाहेर काढण्याअगोदर तिच्या शरीरात बरेच पाणी गेले होते. त्यामुळे या तरुणीची प्रकृती सध्या खालावलेली असून तिच्यावर महानगपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या प्रेमाने आत्महत्या केल्याने ही तरुणीदेखील मागील काही दिवसांपासून नैराश्यात होती. हे दोन्ही प्रेमी मुंबईतील चेंबूर येथील राहणारे असल्याची माहिती मिळतेय.

अहमदनगरमध्ये गोदावरी नदीत उडी घेऊन तरुणीची आत्महत्या  

दुसरीकडे अहमदनगर येथे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीत एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याची घटना 4 जानेवारी रोजी घडली. गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरुन दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तरुणीने उडी घेत जीवनयात्रा संपवली. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray : माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा :उद्धव ठाकरे

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप

Sindhutai Sapkal Death | दुपारी 12 वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार, पुण्यात 2 तास अंत्यदर्शन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.