Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आज (4 फेब्रुवारी) आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 8:44 PM

मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आज (4 फेब्रुवारी) आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याचं नाव जगत सिंग आनंद असं आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता 8 फेब्रुवारीपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नवी काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने 28 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत या प्रकरणी सुमारे 30 पेक्षा जास्त आरोपींना अटक झाली आहे (NCB arrest one more person in Sushant Singh Rajput Drugs connection case).

याच प्रकरणात सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली होती. आज जगत सिंग आनंद याला अटक करण्यात आली आहे. जगत सिंग हा मुंबईतील एक मोठा ड्रग्स व्यापारी आहे. याच प्रकरणात के. जो याला अटक झाली. केजो हा ड्रग्स पेडलर आहे. तो सुशांत सिंग याला ड्रग्ज पुरवायचा, असा आरोप आहे. जगत सिंग ड्रग्स पेडलर केजो याचा भाऊ आहे.

महत्वाचं म्हणजे के जो हा जे काही व्यवसायात पैसे कमवायचा ते पैसे जगतकडे द्यायचा. सुशांत सिंगला ड्रग्स पुरवणारी जी साखळी आहे त्यात जगतचाही रोल स्पष्ट झाल्याने त्याला आज अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात 34 जणांना अटक

दरम्यान, बॉलिवूड प्रकरणात आतापर्यंत एकूण 34 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी शबाना सईद, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यासारख्या कलाकारांची चौकशी केली आहे.

हेही वाचा :

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक

SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला!

‘आमचा तपासच जिंकणार’ म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह….

व्हिडीओ पाहा :

NCB arrest one more person in Sushant Singh Rajput Drugs connection case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.