मुंबईत ड्रग्स तस्करीसाठी माफियांचा नवा मार्ग, थेट निराधार महिलांचा वापर, एनसीबीकडून मोठी कारवाई

आता ड्रग्स माफियांनी आपला मोर्चा वेगळ्या मार्गावर वळवला असल्याचं समोर येतंय.

मुंबईत ड्रग्स तस्करीसाठी माफियांचा नवा मार्ग, थेट निराधार महिलांचा वापर, एनसीबीकडून मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 5:29 PM

मुंबई : ड्रग्स विरोधात एमसीबीने मोठी कारवाई सुरू केली आहे. सर्वच पातळीवर ही कारवाई सुरू आहे. यामुळे आता ड्रग्स माफियांनी आपला मोर्चा वेगळ्या मार्गावर वळवला असल्याचं समोर येतंय. ड्रग्स माफिया आता हवाई मार्गाचा वापर करत असल्याचं एनसीबीच्या कारवाईत उघड झालं आहे. मुख्य म्हणजे ड्रग्स तस्करीसाठी समाजातील गरजू, निराधार महिलांचा वापर केला जात असल्याचं तपासात उघड झालंय (NCB expose new drugs racket using women in Mumbai).

एनसीबीने काल (18 फेब्रुवारी) एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एका महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. यावेळी तिच्याकडे 3 किलो हेरॉईन सापडलं. या महिलेचं नाव खनियांसिले प्रॉमिसे अस आहे. ती दक्षिण आफ्रिकेची आहे. ती जोहान्सबर्ग, दोहा या मार्गाने मुंबईत आली होती. या मार्गाने कधी ड्रग्स येत नाही. हे हेरॉईन अफगाणिस्तान येथील आहे. अफगाणिस्तान येथून भारतात येणाऱ्या ड्रग्सचा मार्ग अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि त्यानंतर भारताच्या सीमेतून हे ड्रग्स भारतात यायचं. त्याच प्रमाणे समुद्र मार्गेही यायचं.

आता मात्र एनसीबीने ड्रग्सच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब सीमेतून भारतात ड्रग्स पाठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रग्स माफियाचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यावेळी मोठया प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं. त्याच प्रमाणे समुद्रातही मोठी कारवाई करून ड्रग्स जप्त केलं आहे. त्यामुळे आता ड्रग्स माफिया नव्या मार्गाच्या शोधात आहेत.

एनसीबीच्या कारवाईत आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे ड्रग्स माफिया स्वतः पुढे न येता आता निराधार महिलांचा वापर करत आहेत. एनसीबीने अटक केलेली दक्षिण आफ्रिकन महिला खनियांसिले प्रॉमिसे ही देखील निराधार आहे. तिला दोन मुलं आहेत. एक मुलगा सात वर्षाचा, तर एक चार वर्षाचा आहे. ती एकल पालक आहे. त्यामुळे तिला पैशाची गरज होती.

महिलेची पैशांची गरज ओळखून ड्रग्स माफियांनी तिचा वापर ड्रग्स कॅरियर म्हणून केला. तिच्याकडे ड्रग्सची बॅग दिली आणि तिला भारतात पाठवलं. तिला कोणाला भेटायचं आहे, कोणाला ड्रग्स द्यायचं आहे हे काहीच माहिती नव्हतं. मात्र, ती आता पकडली गेल्यावर तिला कुणीही फोन केलेला नाही. यापूर्वीच्या कारवाईत अशाच प्रकारे एकल पालक असलेल्या महिला, गंभीर आजारी असलेल्या महिला यांचा वापर ड्रग्सच्या तस्करीसाठी केला जात असल्याचं उघडकीस आलं आहे.

हेही वाचा :

एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक

व्हिडीओ पाहा :

NCB expose new drugs racket using women in Mumbai

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.