ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. (NCB attacked by drug peddlers)
मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर काही जमावाने हल्ला चढवला आहे. यात डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर या ड्रग्ज पेडलर्सने हल्ला केला. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. (NCB Zonal Director Sameer Wankhede attacked by drug peddlers in Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून NCB चे पथक अनेक बॉलिवूड कलाकार आणि मुंबईतील ड्रग्ज पेडलर्सवर छापेमारी करत आहे. आज एनसीबीचे पथक कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सकडे छापेमारीसाठी गेले होते.
त्यावेळी अचानक 50 ते 60 जणांच्या जमावाने तिथे गर्दी करत एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची संपूर्ण टीमला या हल्ल्याचा जबरदस्त धक्का बसला. या हल्ल्यात एनसीबीचे विश्वविजय सिंह आणि शिवा रेड्डी असे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने या ठिकाणची स्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.
Maharashtra: Three people arrested in connection with the incident where NCB Zonal Director Sameer Wankhede and his team were attacked allegedly by drug peddlers in Goregaon, Mumbai last evening. Two officers were injured. Further investigation is underway.
— ANI (@ANI) November 23, 2020
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे. हल्ला झालेल्या ठिकाणाहून कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विपूल युसूफ आणि अजीज अशी या व्यक्तींची नाव आहे. अटक केलेले 3 पैकी दोघेजण हे वडील आणि मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. या चौघांविरोधात IPC कलम 353 अतंर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुशांत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन समोर
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली होती.
गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. (NCB Zonal Director Sameer Wankhede attacked by drug peddlers in Mumbai)