शिवसेनेच्या माजी खासदाराविषयी शिवराळ पोस्ट, अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा

फेसबुकवरुन एकेरी आणि शिवराळ भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यातील मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली (Amol Kolhe brother Sagar Kolhe )

शिवसेनेच्या माजी खासदाराविषयी शिवराळ पोस्ट, अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा
शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:20 PM

पिंपरी चिंचवड : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांचे बंधू सागर कोल्हे (Sagar Kolhe) यांनी शिवराळ भाषेत पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. कोल्हे हे शिरुरचे विद्यमान खासदार आहेत. (NCP MP Dr Amol Kolhe brother Sagar Kolhe framed for defamatory Post against Shivsena MP Shivajirao Adhalrao Patil)

फेसबुकवरुन एकेरी आणि शिवराळ भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यातील मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सागर कोल्हे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर कोल्हे हे खासदार अमोल कोल्हे यांचे बंधू आहेत.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या श्रेयावरुन वाद

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नुकतीच राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी श्रेयासाठी प्रयत्न केल्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते.

‘औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन कोल्हे यांनी केवळ नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे. अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना नेटिझन्सनी ट्रोल केले होते. त्यातच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने डॉ. कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावरही ट्रोल करीत कामाचे श्रेय आढळराव-पाटील यांना दिले’ असं माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले.

सागर कोल्हेंच्या प्रोफाईलवरुन आक्षेपार्ह टिप्पणी

सागर कोल्हे यांच्या नावे असलेल्या फेसबुक प्रोफाईलवरुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. डॉ. कोल्हे आणि शिवाजीराव यांच्यात अनेकदा राजकीय कलगीतुरा रंगताना दिसतो. या प्रकरणी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (NCP MP Dr Amol Kolhe brother Sagar Kolhe framed for defamatory Post against Shivsena MP Shivajirao Adhalrao Patil)

कोण आहेत सागर कोल्हे?

सागर रामसिंग कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे सख्खे धाकटे बंधू. अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यापासून कोल्हे कुटुंब त्यांच्या प्रचारात गुंतले होते. त्यांचे बंधू सागर कोल्हे हेसुद्धा प्रचाराच्या कामात उतरले होते.

संबंधित बातम्या :

काल निवडून आलेला पोरगा 12 वेळा संसदेत बोलला, तुम्ही पहिल्या टर्ममध्ये 8 वेळा, अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला

खा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने ‘ती’ चूक सुधारली!

(NCP MP Dr Amol Kolhe brother Sagar Kolhe framed for defamatory Post against Shivsena MP Shivajirao Adhalrao Patil)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.