राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना जुगार खेळताना अटक; पंढरपूरमध्ये गोंधळ
जुगार अड्यांवर लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्षात वावर असणं हे सुद्धा धक्कादायकच समजलं जातं आहे. नगरसेवकच जुगार खेळत असल्याने राजकीय वरदहस्तानेच हे जुगार अड्डे सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.
पंढरपूर : पंढरपूरमध्ये( gambling) राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना जुगार(gambling) खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी औरंगाबादमधील जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक या जुगार अड्ड्यावर सापडले होते. यानंतर आता पंढरपूरमध्ये नगरसेवक जुगार खेळताना सापडले आहेत. या जुगार अड्यांवर लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्षात वावर असणं हे सुद्धा धक्कादायकच समजलं जातं आहे. नगरसेवकच जुगार खेळत असल्याने राजकीय वरदहस्तानेच हे जुगार अड्डे सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.
नगराध्यक्षाच्या कार्यालयातच सुरु होता जुगाराचा डाव
मंगळवेढा येथे माजी नगराध्यक्षाच्या कार्यालयातच जुगाराचा डाव सुरु होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाड आणि जुगाराचा डाव उधळून लावला. मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष आणि अनेक जण येथे जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले.
पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्षाच्या कार्यालयातच हा जुगाराचा डाव सुरु होता. येथे छुप्या पद्धतीने जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी येथे धाड टाकली.
औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सापडले जुगार अड्ड्यावर
24 ऑगस्ट रोजी औरंगाबादमधील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांसानी धाड टाकली होती. पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच एका हॉटेलमध्येच हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापेमारी केली. विशेष म्हणजे एका नगरसेवकाचाच हा जुगार अड्डा होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.