Crime | ‘किडनी विक मालामाल होशील,’ नेपाळी गायिकेचा वॉचमनच्या बायकोला गंडा, 8 लाख रुपयांना फसवले

एका नेपाळी गायिकेनं नेपाळी वॉचमनच्या बायकोला किडनी विकण्याचं आमिष दाखवत साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत या गायिकेनं महिलेला फसवले आहे.

Crime | 'किडनी विक मालामाल होशील,' नेपाळी गायिकेचा वॉचमनच्या बायकोला गंडा, 8 लाख रुपयांना फसवले
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:02 AM

ठाणे : एका नेपाळी गायिकेनं (Singer) नेपाळी वॉचमनच्या बायकोला किडनी (Kidney) विकण्याचं आमिष दाखवत साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत या गायिकेनं महिलेला फसवले आहे. विशेष म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित महिला या दोघींची भेट झाली होती. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस (Shivaji Nagar) ठाण्यात ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल होऊनही अद्याप पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान हा प्रकाराबद्दल विचारले असता पोलिसांनही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

किडनी विकून मिळाले चार कोटी रुपये 

मूळच्या नेपाळच्या असलेल्या कल्पना मगर या अंबरनाथला त्यांचे पती आणि मुलांसह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती एका बांधकामावर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालनपोषण करतात. कल्पना या नेपाळमध्ये असताना 2019 साली नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. 2020 साली त्या भारतात राहायला आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर रुबिना बादी यांना शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर रुबिना बादी यांच्याशी चॅटिंग करू लागल्यानंतर कल्पना यांनी तिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचं सांगितलं. त्यावर रुबिनाने कल्पना यांना आपण आता दिल्लीत राहायला आलो असून आपण आपली किडनी विकल्यानं आपल्याला 4 कोटी रुपये मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुलाही तुझी किडनी विकायची असल्यास 10 लाख रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील, त्यानंतर तुला परदेशात नेऊन तुझी किडनी काढली जाईल, अशी बतावणी केली.

फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत धाव 

याच आमिषाला बळी पडत कल्पना यांनी रुबिना हीचा पती अरविंद कुमार याच्या खात्यात मे 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत साडेआठ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर आपली किडनी कधी विकली जाईल? अशी विचारणा कल्पना यांनी केली असता रुबिना आणि तिच्या पतीनं टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे कल्पना मगर यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांच्या मदतीने थेट दिल्ली गाठत बँकेतून अरविंद कुमार यांचे डिटेल्स मिळवले आणि दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी अरविंद कुमार आणि रुबिना बादी या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनी 15 दिवसात सगळे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं.

भामट्या गायिकेविरोधात फसवणुकीचा गुन्हा 

मात्र पुन्हा टाळाटाळ सुरू केल्यानं कल्पना मगर यांनी ऑगस्ट 2021 मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी नेपाळी गायिका रुबिना बादी आणि तिचा पती अरविंद कुमार या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र यानंतर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित महिला कल्पना मगर यांनी केला आहे.

गायिकेच्या बँक खात्यावर तब्बल साडे सहा कोटी रुपये 

तर दुसरीकडे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दिल्लीला जाऊन आले. मात्र त्यांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांनी रुबिना बादी आणि तिच्या पतीच्या बँक अकाउंटचे दिल्लीत जाऊन डिटेल्स काढले असता त्यात तब्बल साडेसहा कोटी रुपये जमा असल्याची माहिती समोर आली. त्यामुळं या दोघांनी अशाचप्रकारे देशभरात अनेकांना गंडा घातल्याची भीती व्यक्त होतेय. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना बरेच पुरावे देऊनही पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांनी केला आहे.

पोलीस म्हणतात कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही 

या प्रकरणावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांना प्रतिक्रिया विचारली असता, याप्रकरणात आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं. लोकांच्या घरची धुणीभांडी करून काबाडकष्ट करून जमवलेले पैसे अशा पद्धतीनं लुबाडले गेल्यानं कल्पना मगर यांना पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा आहे. मात्र पोलीस खरोखरच याप्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालून कल्पना यांना न्याय मिळवून देतील का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

इतर बातम्या :

Vasai Beaten : वसईत कौटुंबिक वादातून उच्चभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Clubhouse app chat case:क्लबहाऊस अॅप चॅट प्रकरणात तीन जण ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.