मामीला पाहून भाच्याची नजर फिरली, इच्छाही पूर्ण झाली.. पण तेवढ्यात मामा कळालं अन्..
एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाचे मामाच्या घरी जाणे -येणे होते. मामीची भाच्याशी चांगली मैत्री झाली होती. पण नंतर जे काही घडलं ते पाहून पोलीस ही चक्रावले...

एक अतिशय विचित्र घटना उघडकीस आली आहे. एका युवकाचे मामाच्या घरी सतत जाणे येणे होते. मामीला पाहातच तो प्रेमात पडला. त्याने मामीशी सुरुवातीला चांगली मैत्री केली. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यांच्या या प्रेमकहाणीने सर्व मर्यादा ओलांडल्या. या प्रेम प्रकरणाची माहिती महिलेच्या पतीला कळली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…
एका व्यक्तीने आपली समस्या पोलिसांकडे मांडली. तक्रार ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याच्या ५ मुलांची आई भाच्यासोबत पळून गेली आहे. बराच शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. चार दिवस उलटून गेले तरी पोलिस तक्रार घेत नाहीत असे त्याने म्हटले. तसेच पुरुषांचे कोणी ऐकत नाही असाही आरोप केला.
वाचा: मेहुणीला बहिण आणि भावोजींवर आला संशय, मुलीची डिएनए चाचणी करताच… नको ते समोर आलं
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील परसौंजा गावात 51 वर्षीय महिला आपल्या भाच्यासोबत पळून गेली. त्यामुळे या महिलेचा पती आणि पाच मुले हैराण झाले आहेत. घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन ही महिला आपल्या भाच्यासोबतच पळून गेल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
चित्रकूटच्या परसौंजा गावात कविता नावाची ५१ वर्षीय महिला आपल्या भाच्यासोबत पळून गेली. कविताने घरातून पळून जाताना दागिने आणि रोख रक्कम देखील सोबत घेतली. त्यामुळे पती-पत्नीची पाच मुले अडचणीत आली आहेत. याप्रकरणी पीडितेचा पती परदेशी श्रीवास यांनी पहाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नसल्याचा आरोप त्याने केला आहे. 4 दिवस उलटले तरी कारवाई झाली नसल्याचे परदेशीचे म्हणणे आहे. पोलिस ठाण्यात पुरुषांचे ऐकले जात नाही. माझ्या विरोधात माझी पत्नी पोलिस ठाण्यात गेली असती तर पोलिसांनी मला आतापर्यंत तुरुंगात टाकले असते असे तो म्हणाला.
भाच्यासोबत घरात बिनधास्त राहता यावे यासाठी पत्नीने मला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे. मात्र, तिचा डाव फसल्यामुळे घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती पळाली. पीडितेचे म्हणणे आहे की, त्याच्या मुलीचे लग्न करायचे होते आणि त्याने थोडे थोडे दागिने बनवले होते. या वर्षी मोठ्या मुलीचे लग्न होणार होते. पण आता पत्नीच्या या कृतीमुळे सर्व काही बिघडले आहे. भाच्याची तब्बेत बिघडली असता तो काही दिवसांसाठी मामाकडे राहायला आला होता. त्यानंतर त्याचे सतत घरी येणे-जाणे सुरु झाले. याच काळात दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.