जमिनीवरुन काका-पुतण्यामध्ये वाद सुरु होता, वाद टोकाला गेला अन् पुतण्याला नात्याचाही विसर पडला !

| Updated on: Jul 07, 2023 | 5:27 PM

जमिनीवरुन भावाभावात वाद सुरु होता. हा वाद विकोपाला गेला आणि पुतण्याला संताप अनावर झाला. मग जे घडलं ते धक्कादायक.

जमिनीवरुन काका-पुतण्यामध्ये वाद सुरु होता, वाद टोकाला गेला अन् पुतण्याला नात्याचाही विसर पडला !
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाला संपवले
Follow us on

सोनीपत : संपत्ती आणि जमिनीसाठी लोक काय करतील याचा नेम नाही. अगदी रक्ताच्या नात्यांचाही विसर त्यांना पडतो. अशीच एक रक्तरंजित घटना हरयाणातील सोनीपत येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून पुतण्याने मोठ्या काकाची हत्या केल्याची घटना सोनीपतमध्ये घडली. रामकरण असे मयत काकाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवला. मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरुन पोलिसांना पुतण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

जमिनीवरुन कुटुंबात सुरु होता वाद

सोनीपत येथील भटाणा-जाफराबाद रामकरण आणि त्याच्या भावामध्ये जमिनीवरुन वाद सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी शेतात काम करत असताना रामकरणचा पुतण्या अतुल तेथे आला. जमिनीच्या वादातून त्याने काकाची हत्या केली. त्यानंतर काकाचा मृतदेह शेतात टाकून पुतण्या फरार झाला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.

फरार आरोपीचा शोध सुरु

या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रामकरणच्या मुलाच्या जबाबावरुन पोलिसांनी अतुलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. फरार अतुलला पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा