डिट्टो दृश्यम ! आधी सीनिअरची हत्या केली नंतर मृतदेह लपवून वर टाकली फरशी.. त्याने असं का केलं ?

आरके पुरम भागातील एका सीनिअर सर्व्हेअरच्या मृत्यूसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. त्याची हत्या करून मृतदेह लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. कोणी आणि का केली त्याची हत्या ?

डिट्टो दृश्यम ! आधी सीनिअरची हत्या केली नंतर मृतदेह लपवून वर टाकली फरशी.. त्याने असं का केलं ?
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 3:37 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘दृश्यम’ (Drishaym movie) चित्रपट तर सर्वांनाच माहीत आहे. बऱ्याच जणांचा तो आवडता पिक्चरदेखील आहे. कुटुंबाने केलेला गुन्हा लपवण्यासाठी तो काय-काय क्लुप्त्या करतो, याचा थरारक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पण हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आला होता. मात्र दिल्लीतील एका इसमाने या चित्रपटा प्रमाणेच सेम कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीने त्याच्या सीनिअरची हत्या (murder news) करून मृतदेह लपवण्यासाठी दृश्यममधील क्लुप्तीचाच वापर (crime news) केल्याचे पोलिसांसमोर उघड झाले आहे.

दिल्लीतील आरके पुरम येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका क्लार्कने त्याच्या सीनिअरची हत्या केली. एवढेच नव्हे तर या हत्येनंतर त्याचा मृतदेह सरकारी क्वॉर्टरमागेच दफन केला आणि त्याच्यावर पक्की फरशी टाकली. पण हत्येच्या पाच दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासादरम्यान त्याने दिलेल्या कबुलीमुळे ते सगळेच चक्रावले.

का केली सीनिअरची हत्या ?

अनीस असे आरोपीचे नाव असून तो क्लार्क आहे. तर महेश कुमार असे मृत इसमाचे नाव असल्याचे समजते. पोलिसांच्या चौकशीत अनिसने त्याचा गुन्हा कबूल केला. सीनिअर सर्व्हेअर असलेल्या महेश कुमारची अनिसच्या प्रेयसीवर वाईट नजर होती. एवढेच नव्हे तर महेशने अनीसकडून 9 लाख रुपये घेतले होते, ते पण परत करणे बाकी होते. या दोन्ही गोष्टींमुळे अनिस खूप दु:खी होता आणि त्याने महेशला मारण्याचा प्लान आखला. त्याने दृश्यम चित्रपटाप्रमाणे प्लान बनला आणि ऑफीसमधून सुट्टी घेऊन 28 ऑगस्ट रोजी तो लााजपत नगर मार्केटमध्ये गेला. तेथे त्याने 6 फूट लांबीची पॉलिथीन व फावडे विकत घेतले.

त्याच दिवशी दुपारी अनीसने त्याचा सीनिअर महेशला आरके पुरम सेक्टर २ मध्ये असलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये बोलावले. दुपारी बाराच्या सुमारास महेश त्याच्या घरी पोहोचला असता, अनीसने त्याच्या डोक्याच पाईप मारून त्याची हत्या केली. महेशचा मृत्यू झाल्यानंतर अनिस हा बाईकवरून सोनीपत येथील त्याच्या घरी गेला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणूनच त्यान सोनीपत येथील घर गाठलं.

दुसऱ्या दिवशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी अनिस त्याच्या घरी परत आला आणि सरकारी क्वॉर्टरच्या मागे असलेल्या जागेत सुमारे दीड फूटचा खड्डा खणून त्यामध्ये मृतदेह पुरला. एवढेच नव्हे तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पक्की फरशी बसवली. याप्रकरणी पोलिसांनी सलग ४ दिवस तपास सुरू ठेवला होता. अखेर सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर पोलिसांनी महेशचा मृतदेह २ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.