माशाच्या कालवणात थेलियम मिसळले, सासूचा मृत्यू, पत्नी कोमात; सद्दाम हुसेनचं पुस्तक वाचून रचला कट
दिल्लीच्या एका रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण अरोरा यांनी इराकचा तानाशाह (Businessman Gave The Thallium To Wife And In Laws) सद्दाम हुसेनबाबत इंटरनेटवर वाचलं होतं की तो आपल्या राजकीय विरोधकांना मारण्यासाठी थेलियम नावाचा विषारी पदार्थाचा वापर करत होता.
नवी दिल्ली : दिल्लीच्या एका रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण अरोरा यांनी इराकचा तानाशाह (Businessman Gave The Thallium To Wife And In Laws) सद्दाम हुसेनबाबत इंटरनेटवर वाचलं होतं की तो आपल्या राजकीय विरोधकांना मारण्यासाठी थेलियम नावाचा विषारी पदार्थाचा वापर करत होता. याच आयडियावर दिल्लीतील व्यावसायिकाने आपल्या सासू आणि पत्नीचा खून करण्याचं ठरवलं. या व्यक्तीने फेब्रुवारी महिन्यात आपल्या सासू, सासरे, मेव्हणी आणि पत्नीला माशाच्या कालवणासोबत थेलियम खाऊ घातले. त्यानंतर नुकतंच त्याच्या सासूची मृत्यू झाली आणि त्याची पत्नी कोमामध्ये गेली. तर मेव्हणीचाही मृत्यू झाला (New Delhi Murder Case Businessman Gave The Thallium To Wife And In Laws Inspiring From Saddam Husain).
Man arrested for allegedly poisoning his in-laws in Inderpuri area over arguments with them, say Delhi Police
— ANI (@ANI) March 25, 2021
या प्रकरणाचा खुलासा कसा झाला?
या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा या व्यक्तीचे सासरे आणि होमिओपॅथी औषधींचे निर्माता देवेंद्र मोहन शर्मा हे पोलिसांकडे पोहोचले. त्यांनी त्यांच्या पत्नी अनिता शर्मा यांचा गंगा राम रुग्णालयात मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येप्रकरणी देवेंद्र शर्मा यांना जावई वरुण अरोरावर संशय आहे. सासऱ्याने फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेचा उल्लेखही केला जेव्हा या जावयाने संपूर्ण कुटुंबाला मासे बनवून खाऊ घातले, पण त्याने आपल्या मुलांना ते खाऊ दिलं नाही, तसेच स्वत:ही ते खाल्लं नाही. या खाण्यात त्याने विषारी पदार्थ मिसळला होता.
पोलिसांनी जेव्हा मृतक सासूचं शवविच्छेदन करवलं तेव्हा महिलेच्या शरिरात थेलियम मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचीही आरोग्य तपासणी केली जा कोमात होती. आरोपीच्या पत्नीच्या शरिरातही थेलियमची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळून आली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या लॅपटॉप आणि सिस्टिम जप्त करु तपास केला. यामध्ये पोलिसांना त्याच्या इंटरनेट हिस्ट्रीमध्ये सद्दाम हुसेन संबंधित माहिती मिळाली. यामध्ये त्याने वाचलं होतं की कशा प्रकारे सद्दाम हुसेन आपल्या राजकीय विरोधकांना जीवानिशी मारण्यासाठी थेलियमचा वापर करतो. सध्या पोलिसांनी आरोपी व्यावसायिक वरुण अरोराला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
थेलियम काय असतं?
थेलियम एक आत्याधिक विषारी धातू रासायनिक तत्व आहे. याचा शोध इंग्रजी वैज्ञानिक विलिअम क्रुक्स यांनी 19 व्या शताब्दीत एका विशेष सेलेनियम युक्त पायराईटमध्ये वर्णक्रममापी उपकरणाद्वारे केली होती. थेलियमचा उपयोग किटक आणि उंदिरासाठी विष म्हणून केलं जात होतं. कारण, याच्या विषबाधेमुळे माणसांना धोका होता त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला होता. कुणाचा जीव घेण्यासाठी या थेलियमची चिमुटभर मात्राचं पुरेशी आहे.
New Delhi Murder Case Businessman Gave The Thallium To Wife And In Laws Inspiring From Saddam Husain
संबंधित बातम्या :
मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा
विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले, पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या
Nikita Tomar Murder Case : फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल, आरोपी तौसीफ, रेहान दोषी, एकाची सुटका
अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड