इथं आईची माया आटली… संतापजनक कृत्याने शहरात उडाली खळबळ…

| Updated on: Oct 29, 2022 | 5:30 PM

अर्भक आढळून आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा यामध्ये आधार घेण्यात आला असून संबंधित कचऱ्याची घंटागाडी कोणत्या विभागातून आली होती याची माहिती काढण्यात आली.

इथं आईची माया आटली... संतापजनक कृत्याने शहरात उडाली खळबळ...
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या खत प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा विलगीकरण करत असतांना एका कर्मचारी महिलेला स्री जातीचे अर्भक आढळून आले होते. या महिलेने तात्काळ याबाबत वरिष्ठांना कळविल्याने घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. आवेश पलोड घटनास्थळी दाखल झाले होते. नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळविण्यात आल्याने त्यांनी तपसणी केली त्यात ते स्री जातीचे असल्याचे निश्चित झाले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये नाशिक महागनर पालिकेच्या घंटागाडीत आलेल्या कचऱ्यातून हे अर्भक आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत एकूण सहा विभाग आहे. सहा विभागातून शेकडो टन कचरा दररोज खतप्रकल्पाच्या ठिकाणी येत असतो.

त्याचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया झाली की, ओला सुखा आणि प्लॅस्टिक यांचे वर्गीकरण केले जाते, त्यातच प्लॅस्टिकच्या पिशवीतच हे अर्भक आढळून आले होते.

हे सुद्धा वाचा

अर्भक आढळून आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा यामध्ये आधार घेण्यात आला असून संबंधित कचऱ्याची घंटागाडी कोणत्या विभागातून आली होती याची माहिती काढण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. प्रशांत शेटे, बालरोग तज्ञ डॉ. विनोद पावसकर यांच्या तपासणीत अर्भक हे 30 ते 32 आठवडयाचे असून 24 तासांपूर्वी जन्माला आल्याचे स्पष्ट झाले आहे.

घंटागाडीतून कचऱ्याच्या वर्गीकरणातून अर्भक हे नाशिक पूर्व विभागाच्या घंटागाडीतून खतप्रकल्पात आल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आल्याचा प्राथमिक संशय आहे, याबाबत कुणाला काही कल्पना असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन नाशिक पोलीसांनी केले आहे.