Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॉरी जान, 2 दिवस लेट झाला ! प्रियकराच्या निधनानंतर नववधूनेही संपवलं जीवन

ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली, तो अर्ध्या वाटेतच सोडून गेल्याचा धक्का नववधूला सहन झाला नाही. तिनेही तिचं आयुष्य संपवलं.

सॉरी जान, 2 दिवस लेट झाला ! प्रियकराच्या निधनानंतर नववधूनेही संपवलं जीवन
कौटुंबिक वादातून पत्नीसह सासू-सासऱ्यांना संपवले
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 11:06 AM

जयूपर : प्रेयसीच्या लग्नामुळे उध्वस्त झालेल्या प्रियकराने विहीरीत उडी मारून जीव दिला. तर प्रियकराच्या जाण्याचे वृत्त कळल्यावरअवघ्या दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूनेही ( newly married woman killed herself) तिच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांच्याही मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियांचा दु:खाला पारावार उरलेला नाही. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही दु:खद घटना घडली असून आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीने सोशल मीडियावर तिचा व प्रियकराचा फोटो टाकत एक स्टेटसही शेअर केले होते.

‘आपण एकत्र जगण्या-मरण्याची शपथ घेतली होती ना, मग एकट्याने असे पाऊल का उचलले? तू मला या क्रूर जगात एकटे का सोडले ? असा सवाल प्रेयसीने विचारला आहे. ‘ पण हरकत नाही, आता मी तुझ्याकडे येत आहे. तू नेहमीच माझी जान असशील. दोन दिवस झाला, त्यासाठी माफ कर.’ अशा आशयाचा मेसेज तिन लिहीला आहे.

4 जुलै रोजी झाले होते लग्न

शोभाला जेतमाल येथे राहणाऱ्या या युवतीचे (वय २२) आणि त्याच गावातील एका तरूणाचे (वय २८) एकमेकांवर प्रेम होते. दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होते. मात्र अचानक ४ जुलै रोजी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले. यामुळे हताश झालेल्या प्रियकराने त्याच दिवशी विहीरीत उडी मारून जीव दिला. ५ जुलै रोजी जेव्हा ती नवविवाबीत तरूणी माहेर आली, तेव्हा तिला तिच्या प्रियकराच्या आत्महत्येबद्दल कळलं.

विहीरीत सापडला नवविवाहीतेचा मृतदेह

शुक्रवारी, 7 जुलै रोजी सकाळी विवाहीत तरूणी तिच्या घरातून भांडी घेऊन गोठ्यात, दूध काढण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या पायाच्या ठशांवरून शोधत-शोधत तिचे नातेवाईक विहिरीजवळ पोहोचले. तेथे विहिरीत त्या नवविवाहितेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.