10 लाख दे तरच… लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही पतीने जवळ येण्यास दिला नकार, केली हुंड्याची मागणी, पत्नीची पोलिसांत धाव
नववधूने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्यानुसार लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही पतीने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. एवढेच नव्हे तर त्याने तिच्याकडे घरून 10 लाख रुपये आणण्याची मागणीही केली.
Pilibhit Crime : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पिलीभीतमधून एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे, आणि हे सर्व नक्की काय आहे, असा प्रश्न पडला आहे. खरं तर, इथे एका नववधूने तक्रार केली आहे आणि तीही तिच्या नवऱ्याविरोधात. पण ही तक्रार इतर सर्व तक्रारींपेक्षा थोडी वेगळी आहे.
10 लाख आण मगच जवळ घेईन
वधूचं म्हणणं आहे की लग्नाला तीन महिने झाले तरी तिच्या पतीने तिला जवळ घेतलेले नाही. तिच्यासोबत द्याप तिच्यासोबत हनिमून साजरा केलेला नाही. फिर्यादीत वधूने लिहिले आहे की, वराचे म्हणणे आहे की, आधी हुंडा म्हणून 10 लाख रुपये आणा, मगच मी हनिमून साजरा करेन. पिलीभीत कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी ही तक्रार पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण या तक्रारीत वधूने लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही पतीवर शारीरिक संबंध न ठेवल्याचा आरोप केला होता. आणि त्याऐवजी दिलेला युक्तिवाद अधिक गंभीर होता. कारण नववधूने पतीवर 10 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे.
पतीने काढला अश्लील फोटो
लेखी तक्रारीनुसार, या लग्नासाठी वर आणि वधूच्या कुटुंबांमध्ये पाच लाख रुपयांचा करार झाला होता. यानंतर वधू-वर नैनितालला हनिमून ट्रिपला गेले. तरुणीच्या तक्रारीनुसार, नैनितालमध्ये काही वेळा तिच्या पतीने अश्लील फोटो काढले आणि त्यानंतर आता त्याच फोटोंच्या बदल्यात दहा लाख रुपये आणण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत आहे. पैसे दिल्यानंतरच हनिमून साजरा करणार असल्याचे तो सांगतो.
10 लाख आणले तरच जवळ घेईन
नवरा आणि सासूने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप वधूने केला आहे. दोघेही तिच्यावर अत्याचार करून हुंड्याची मागणी करत आहेत. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, 6 फेब्रुवारी 2023 रोजी तिचे लग्न बिसौली भागात राहणाऱ्या मुलाशी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या स्टेटसनुसार लग्नावर 20 लाख रुपये खर्च केले. 15 लाखांचे दागिनेही हुंडा म्हणून दिले. पण पतीने लग्नानंतरही तिच्यासोबत हनिमून साजरा केला नाही. तीन महिने उलटूनही तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत.
मुलीच्या तक्रारीनुसार, तिने सर्वप्रथम 29 मार्च रोजी हा प्रकार सासूला सांगितला, मात्र सासूने याकडे लक्ष दिले नाही. यानंतर तिने ने हा प्रकार आईला सांगितला. 22 एप्रिल रोजी वऱ्हाडी सासरच्या घरी गेले असता सासूने सुनेला काही आजार असेल तर उपचार करा, असे सांगितले, तर वराने सांगितले की 10 लाख रुपये द्या, तो हनिमूनला जाणार आहे.
वधूला केले ब्लॅकमेल
तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी वराला 5 लाख रुपये दिले, त्यामुळे तो पत्नीसोबत हनिमूनला नैनितालला गेला. नववधूच्या म्हणण्यानुसार, ती हनीमूनच्या वेळी तिच्या पतीसोबत खोलीत राहिली होती, परंतु त्यांच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. मुलीने त्याबद्दल पतीला विचारले असता त्याने उर्वरित पाच लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले.
एवढेच नव्हे तर पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले. आता तिच्या पतीचे म्हणणे आहे की जर त्याला पैसे दिले नाहीत तर तो हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. 13 मे रोजी ही तक्रार आल्यानंतर आता पिलीभीत कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या मुलीला नाहक त्रासातून मुक्त करून न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोलिसांना सांगितले.