Nalanda News: सासरच्यांकडून नवविवाहित महिलेची हत्या, नातेवाईकांनी कारण सांगताचं माहेरकडचे लोक संतापले
Newly Married Girl Murder: शेतात पुरलेला नवविवाहित महिलेचा मृतदेह सापडला, सासरचे लोक फरार, नातेवाईक म्हणतात...
बिहार : बिहार (Bihar) राज्यात क्राईमची (Crime) रोज नवी प्रकरणं उजेडात येत असतात. नालंदा (Nalanda News) जिल्ह्यात कल्याण बीघा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक प्रकरण उजेडात आलं आहे. त्यामुळे गावातल्या अनेकांना हादरा बसला आहे. एका नवविवाहितेच्या सासरच्या लोकांनी हत्या केली आहे. नवविवाहितेला मारहाण होत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी मुलीच्या आई-वडिलांना ज्यावेळी दिली, त्यावेळी हे प्रकरण उजेडात आलं आहे.
काही महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. नवविवाहितेला माहेरच्या लोकांकडून मोटारसायकल घेऊन ये असा तगादा सासरच्या लोकांनी लावला आला होता. त्याचबरोबर तरुणीला सतत मारहाण सुध्दा करण्यात येत होती. ज्यावेळी तरुणीचा मोबाईल बंद झाला. त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिचं घरं गाठलं. परंतु त्यापुर्वी तीची हत्या करण्यात आली होती.
सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्यानंतर घराला कुलूप लावलं होतं. नवविवाहितेच्या कुटूंबियांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठलं.
पोलिसांनी सगळ्या घराची झडती घेतली. त्यानंतर त्यांचा संशय बळावला आणि संपुर्ण परिसराची पाहणी सुरु केली. ज्यावेळी त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना नवविवाहितेचा पुरलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी दिला आहे.
नातेवाईकांनी सांगितलं की, सासरच्या लोकांकडून हुंडा आणि मोटारसायकल आणण्यासाठी कायम तगादा लावला जात होता. परंतु मागण्या पुर्ण होत नसल्यामुळे नवविवाहितेला अनेकदा जबर मारहाण करण्यात येत होती.