लग्नानंतर 7 व्या दिवशीच प्रियकरासह पळाली नववधू, जाण्यापूर्वीच वडिलांसोबत जे केलं त्याने…
एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. तेथे एक नववधू लग्नाच्या अवघ्या आठवड्याभरातच तिच्या प्रियकरासह पळून गेली. धक्कादायक गोष्ट म्हणजे पळून जाताना तिच्या वडिलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना थेट..
Crime News : माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला दुसर काही दिसत नाही. प्रेमात माणूस आंधळा होतो, असंही म्हणतात. पण त्याच प्रेमापायी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पहात नसेल, तर याला खरंच प्रेम म्हणायचं का ? हाच प्रश्न पडू शकेल अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. तेथे एक नववधू लग्नाच्या अवघ्या आठवड्याभरातच तिच्या प्रियकरासह पळून गेली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे पळून जाताना तिच्या प्रियकराने त्या तरूणीच्या वडिलांना कारने चिरडून त्यांची हत्या केली. बीरभूम येथील बोलपूरमधील यज्ञनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुद्दुस शेखची मुलगी कुतबा खातून हिचे त्याच गावातील गजू शेख याच्याशी संबंध होते. पण कुद्दुस यांना त्या दोघांचं नातं मान्य नव्हतं, म्हणूनच त्याने त्याच्या मुलीचं लग्न दुसऱ्या इसमाशी लावून दिलं.
पण लग्नानंतर 7 दिवसानंतर कुतबा ही एका विधीसाठी तिच्या पतीसह माहेरी आली होती. मात्र तेवढा पूर्ण काळ ती गजू शेखसोबत संपर्कातच होती. कुतबा घरी येताच गजू हादेखील कार घेऊन तिथे पोहोचला. त्यानंतर त्या दोघांनीही कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
किडनॅपिंग आणि खुनाचा गुन्हा
मात्र आपली लेक गजूसोबत पळून जात असल्याचे दिसताच तिचे वडील कुद्दुस हे त्यांच्या कार अडवण्यासाठी समोर जाऊन उभे राहिले. पण त्यांनी गाडी थांबवलीच नाही. गजूने गाडी थेट त्यांच्या अंगावर चालवली आणि त्यांना चिरडून तो पुढे गेला. यामुळे गंभीर जखमी झालेला कुद्दुस यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुद्दुस शेख यांच्या कुटुंबियांनी गजू याच्यावर किडनॅपिंग आणि खुनाचा आरोप लावत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.