NIAची टीम सकाळी-सकाळी भिवंडीच्या पडघ्यात घुसली, छापेमारी अन् धरपकडीने भिवंडीत खळबळ

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई करत 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

NIAची टीम सकाळी-सकाळी भिवंडीच्या पडघ्यात घुसली, छापेमारी अन् धरपकडीने भिवंडीत खळबळ
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 9:23 AM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 डिसेंबर 2023 :

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई करत 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ही कारवाई केली आहे. पडघासह एनआयएने राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने ISIS या दहशतवादी संघटनेच्या विरोधात ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. एनआयने कर्नाटकसह महाराष्ट्रात 41 ठिकाणी छापे टाकले. आधीच अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या मागावर छापे टाकले जात आहेत. यामध्ये कर्नाटकातील 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 ठिकाण छापेमारी केली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघा येथे कारवाई करण्यात आली. तेथील गावातून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं. तसेच भिवंडीमध्ये सुद्धा एनआयए अधिकाऱ्यांनी कारवाई केली. शहरातील तीनबत्ती ,शांतीनगर व इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएच्या छापेमारीनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली असून सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

एनआयएने छापेमारी दरम्यान अतिरेक्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, इसिसचे हँडलर्स या सर्वांचा पर्दाफाश केला. देशभरात दहशवादी कारवाया घडवून आणण्याचा त्यांचा भयानक कट या छाप्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. देशात इसिसची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुणे शहरातून हे नेटवर्क चालत होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.