सचिन वाझेंची वैद्यकीय तपासणी, NIA अधिकारी आणि डॉक्टर सॅम्पलसह रवाना

एनआयएच्या अधिकाऱ्यांचं एक पथक आणि डॉक्टर सचिन वाझे यांचे काही सॅम्पल वैद्यकीय तपासाच्या अनुषंगाने घेऊन गेले. (NIA API Sachin Vaze Medical Test)

सचिन वाझेंची वैद्यकीय तपासणी, NIA अधिकारी आणि डॉक्टर सॅम्पलसह रवाना
सचिन वझे यांची वैद्यकीय तपासणी
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 4:02 PM

मुंबई : एनआयएच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांची डॉक्टरांनी तपासणी केली. सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ येत असल्याची माहिती आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia Bomb Scare) आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren Death Case) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. (NIA Team and Doctors collect samples of Suspended API Sachin Vaze Medical Test)

सचिन वाझेंच्या तब्येतीची काळजी

एनआयएच्या अधिकाऱ्यांचं एक पथक आणि डॉक्टर सचिन वाझे यांचे काही सॅम्पल वैद्यकीय तपासाच्या अनुषंगाने घेऊन गेले. सचिन वाझे यांना वयोमानानुसार काही आजार आहेत. त्यांनी अटकेपूर्वी व्हॉट्सअॅपवर गंभीर पोस्ट केली होती. यानंतर त्यांना अटक झाल्यापासून एनआयएचे अधिकारी सतत त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत.

वाझेंना उद्या कोर्टात हजर करणार

रोज सकाळ, संध्याकाळ सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी येत असतात. सचिन वाझे यांची एनआयए कोठडी उद्या संपत असल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. मात्र रक्त, डायबिटीज यांचे रिपोर्ट तात्काळ मिळणार नाहीत. त्यामुळे या चाचण्या आजच करुन त्याचे रिपोर्ट उद्या आल्यावर कोर्टात सादर केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास अखेर NIA कडे सोपवण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून हस्तांतरणाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तपास करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला मोठा झटका बसला आहे.

वॉल्व्हो कार थेट दमणमधून जप्त

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. एटीएसने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी वापरलेली वॉल्व्हो कार थेट दमणमधून जप्त केली आहे. न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) टीमला वॉल्व्हो कारच्या डिकीमधून दोन बॅग सापडल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि पांढरा शर्ट मिळाला आहे. त्या बरोबरच एक मास्क आणि मोबाईल चार्जरही आढळला आहे. एकूण तीन जोड कपडे आणि टॉवेल सापडले आहेत. (NIA Team and Doctors collect samples of Suspended API Sachin Vaze Medical Test)

चूर्ण सदृश्य बाटल्या आणि सॅनिटायझरचा कॅन

गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. गाडीत सापडलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर बोटांचे ठसे चेक केले जात आहेत. गाडीत पायाखाली असलेल्या मॅट झटकून त्यावरची माती ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीत अन्यत्र कुठेही बोटांचे ठसे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

व्हॉल्वो कार माझ्या नावे, पण ना वाझेंना भेटलो, ना अभिषेक अग्रवालला, मालक मनिष भातिजांचा दावा

(NIA Team and Doctors collect samples of Suspended API Sachin Vaze Medical Test)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.