उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे, 21 जूनला गळा कापून झाली होती निर्घृण हत्या

अमरावतीमध्ये 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिकांची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे असे या व्यवसायिकाचे नाव आहे. दरम्यान आता या हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे, 21 जूनला गळा कापून झाली होती निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 2:30 PM

अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati) 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल (Medical) व्यावसायिकाची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे असे या व्यवसायिकाचे नाव आहे. दरम्यान आता या हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची देखील यावेळी एनआयएच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. या हत्यामागे  नुपूर शर्मा यांच्याशी संबंधित वाद असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसा आरोप देखील भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर त्यांची हत्या झाली. त्यामुळे आता या प्रकरणाचा या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याचा देखील तपास करण्यात येत आहे. कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

एनआयएकडून चौकशीला सुरुवात

दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे  एनआयए पथकाने पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली असून, आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हे हत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....