फरीदाबाद : निकिता तोमर हत्याकांडातील दोषी तौसीफ आणि रेहानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फरीबाद फास्ट ट्रॅक कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेच्या शिक्षेसह आरोपींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फरिदाबाद कोर्टानं काल दोन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी अजरुद्दीनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.(Nikita Tomar murder accused Tousif and Rehan sentenced to life imprisonment)
गुरुवारी आरोपींना दोषी करार दिल्यानंतर आज शिक्षेबाबत सुनावणी पार पडली. त्यावेळी निकिता तोमर कुटुंबियांच्या वकिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मागणी करत एक उदाहरण प्रस्थापित करण्याचं आवाहन न्यायालयाला केलं होतं. तर बजाव पक्षाच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेच्या मागणीला विरोध करताना हे प्रकरण रेयरेस्ट ऑफ रेअर प्रकारातील नसल्याचं म्हटलं. दोन्ही दोषी विद्यार्थी आहेत, त्यामुळे या बाबीकडे न्यायालयाने लक्ष द्यावं, असं आवाहन आरोपींच्या वकिलांनी केलं होतं.
26 ऑक्टोबर 2020 मध्ये हरियाणाच्या वल्लभगड इथं निकिताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निकिता ही B.Comच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. आपल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन ती परतत असताना तिघांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. निकिताने विरोध करताच गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. हत्येचा हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. फरीदापास पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तौसीफ, रिहान आणि अजरुद्दीनला अटक केली होती.
फास्ट ट्रॅक कोर्टाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी ट्रायल सुरु केली. या प्रकरणात एकूण 30 सुनावणीमध्ये ट्रायल पूर्ण झाली. त्यानंतर कोर्टाने 23 मार्च रोजी आपला निकाल सुरक्षित केला. ट्रायल दरम्यान वादींकडून 55 आणि प्रतिवादींकडून 2 साक्षिदार हजर करण्यात आले. दरम्यान, कोर्टाच्या निकालापूर्वी निकिताचे वडील मुलचंद यांनी कोर्टाकडून अपेक्षा व्यक्त केली होती की, दोषींना फाशीची शिक्षा सुनावली जाईल. ज्या प्रकारे एका हिंदू मुलीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा लव्ह-जिहादचा प्रकार आहे. सरकारने निकिताचा योग्य सन्मान केला पाहिजे आणि अशा प्रकरणात विशेष कायदा बनवला पाहिजे. ज्या माध्यमातून अन्य मुलींचा जीव वाचवता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
BREAKING: Life sentence for Nikita Tomar’s murderers Tauseef & Rehan. She was killed in October last year by her stalker in Delhi suburb Faridabad (Haryana), the incident caught on CCTV. pic.twitter.com/HvBVrQYOP0
— Shiv Aroor (@ShivAroor) March 26, 2021
संबंधित बातम्या :
Nikita Tomar murder accused Tousif and Rehan sentenced to life imprisonment