बारा वर्षे मृत्यू तिचा पाठलाग करीत होता, ड्रंकन ड्राईव्ह केसची काय आहे केमिस्ट्री
तिने मलबार हील्सच्या मित्रांच्या फ्लॅटमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर ती मुंबई सेंट्रलच्या पबमध्ये गेली, नंतर पुन्हा तिने बीयर खरेदी केली आणि आपल्या कारने ती चर्चगेट दिशेने निघाली होती. त्यावेळी...
मुंबई : मध्यरात्री तीनचा सुमार होता. मलबार हील येथील पॉश इलाख्यात राहणाऱ्या तिने मुंबई सेंट्रल येथे पब गाठला आणि दारु प्यायली, त्यानंतर तिने वाईन शॉप्समधून आणखी बियरच्या बाटल्या खरेदी केल्या. आणि आपल्या आलिशान होंडा सीआरव्हीने ती चर्चगेट दिशेला निघाली होती. नेमके तिथे मरीनलाईन जवळ ट्रॅफीक पोलीसांचा तपासणी सुरु होती आणि तिने बेफामपणे पोलीस आणि दुचाकीस्वाराला उडविले…
बरोबर 12 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने मुंबईत खळबळ उडाली होती. काळबादेवी ट्रॅफीक डीव्हीजनच्या स्पेशल ड्राईव्हमध्ये ड्यूटी बजावणाऱ्या पोलिस उप निरीक्षक दिनानाथ शिंदे आणि दुचाकीस्वार अफजल इब्राहिम दोघांना एका मद्यधुंद ब्युटीशियन कम हेअर स्टायलिस्टच्या सुव्ह खाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ आणि संताप व्यक्त केला गेला होता. मिडीयामध्ये हे प्रकरण खूपच गाजले होते.
फ्लॅटमध्ये पार्टी केली
अमेरिकन भारतीय नागरिक ( एनआरआय ) नुरीया हवेलीवाला हीने मलबार हील्सच्या मित्रांच्या फ्लॅटमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर ती मुंबई सेंट्रलच्या पबमध्ये गेली नंतर पुन्हा तिने बीयर खरेदी केली आणि आपल्या कारने ती चर्चगेट दिशेने निघाली होती. त्यावेळी तिच्या मद्याचा अंमल होता. नूरीया हवेलीवाला 30 जानेवारी 2010 च्या रात्री 12.10 वाजता ऑपेरा हाऊस येथे आली होती.
नूरीया कशी बचावली
त्यानंतर नूरीया सुव्हने चर्चगेटच्या दिशेने बेफाम वेगाने निघाली. त्यावेळी तिने एका टॅक्सीला नंतर पोलीसांच्या जीपला उडविले. त्यात उप निरीक्षक शिंदे आणि दुचाकी चालक खान यांचा जागीच मृत्यू झाला. तर हवालदार शैलेंद्र जाधव जखमी झाले. इतक्या भीषण अपघातातही ड्रायव्हींग स्टीअरिंगखालील एअरबॅग उघडल्याने नूरीया अलगद बचावली.
केस काय दाखल झाली
पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासीत तिच्या रक्तात अल्कोहोल आणि ड्रग्जचे पुरावे आढळण्याने लोकमान्य टीळक मार्ग पोलिसांनी नुरीयावर सदोष मनुष्यवध कलम 304 (||) आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 चे कलम 27 ( a) लावले कोर्टात खटला दाखल केला. हायकोर्टात तिने ड्रंक एण्ड ड्राईव्ह केस विरोधात अपिल केले होते.
कोर्टाला कळविले
नूरीया हीच्या आईने तिच्या वडीलांचा 2010 मध्ये मृत्यू झाला आहे. आता मला 88 व्या वर्षांत तिच्या शिवाय सांभाळणारे कोणी नाही, आपल्या मुलीला दोषमुक्त करावे अशी मागणी तिची वयोवृद्ध आई अलिफया युसूफ हवेलीवाला हीने हायकोर्टात केली होती. परंतू 41 व्या वर्षीच नूरीया हीचा लिव्हरच्या आजाराने 4 जुलै रोजी सैफी हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक मृ्त्यू झाल्याचे तिच्या आईने एल.टी. मार्ग पोलिसांना कळविले आता कोर्टाच्या पुढील तारखेला ही माहीती कोर्टाला कळविली जाणार आहे.