सलमानच नव्हे श्रद्धा वालकरचा मारेकरी अन् मुनव्वर फारूखीही टार्गेटवर ! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिट लिस्टमध्ये कोण-कोण?

प्रख्यात कॉमेडियन मुनव्वर फारूकी आणि श्रद्धा वालकरचा अतिशय निर्घृणपणे खून करणारा आफताब पूनावाला हे दोघं देखील याच बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सलमानच नव्हे श्रद्धा वालकरचा मारेकरी अन् मुनव्वर फारूखीही टार्गेटवर ! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिट लिस्टमध्ये कोण-कोण?
बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर कोण-कोण ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 9:19 AM

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला महिन्यभराचा कालावधी उलटून गेला असून याप्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिद्दीकींवर गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत. याचदरम्यान त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. दरम्यान प्रख्यात कॉमेडियन मुनव्वर फारूकी आणि श्रद्धा वालकरचा अतिशय निर्घृणपणे खून करणारा आफताब पूनावाला हे दोघं देखील याच बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘बिगबॉस 17’ चा विजेता असलेला मुनव्वर फारूखी नेहमी चर्चेत असतो, काही दिवसांपूर्वी त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले होते, त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

त्याने त्याच्या शोमध्ये हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवली होती, असा आरोप मुनव्वर याच्यावर आहे, त्यासाठी त्याला तुरूगांची हवादेखील खायला लागली. हिंदू देव-देवतांवर मुनव्वरने केलेल्या टिप्पणीमुळे लॉरेन्स बिश्नोईदेखील चिडला असून म्हणूनच त्याने मुनव्वरला मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. त्याच कारणाने तो बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता. लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक आणि बाबा सिद्दीकी हत्येचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकरच या हत्येचं प्लानिंग करत होता, असेही समोर आले आहे. शुभम लोणकर अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

श्रद्धा वालकरचा मारेकरीही टार्गेटवर

तर 2022 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिचा निर्घृणपणे खून करणारा तिचा मित्र आफताब पूनावाला हा सध्या तिहार तुरूंगात कैद आहे. त्याने त्याची लिव्ह -इन पार्टनर श्रद्धा हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आणि ठराविक काळाने ते तुकडे त्याने मेहरौली येथील जंगलात फेकून दिले. हे हत्याकांड समोर येतचा राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या त्याच्याविरोधात खटला सुरू आहे. हाच आफताबही लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर होता, अशी माहिती बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणातील आरोपी शिवकुमार याच्या चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर तिहार तुरूंगात कैद असलेल्या आफताब याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा, शर्ट बदलून पुन्हा घटनास्थळी आला मारेकरी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याने या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. शिवकुमार पकडला गेल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गोळीबारानंतर त्याने कपडे बदलले आणि नंतर घटनास्थळी आल्याचे आरोपीने उघड केले. सिद्दीकी यांना मारल्यानंतर आरोपी गौतम कपडे बदलून घटनास्थळी परतला होता. “त्याने शर्ट, पिस्तूल आणि आधार कार्ड असलेली बॅग घटनास्थळी फेकून दिली होती,” असे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर लोक घाबरले आहेत, मोठ्या संख्येने पोलीस तेथे आले आहेत आणि पोलीस मारेकऱ्यांबद्दल सुगावा घेण्यासाठी जवळ उभ्या असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत असे शिवकुमारने तेव्हा पाहिले होते. आपल्या दोन साथीदारांना अटक झाल्याचेही त्याने पाहिले. एवढंच नव्हे तर बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शिवकुमार गौतम हा रिक्षाने लीलावती हॉस्पिटलमध्ये देखील गेला होता आणि त्यानंतर 12 ऑक्टोबरच्या रात्री 10:47 वाजता कुर्ला रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याने आपला मोबाईल फेकून दिला, अशी माहितीदेखील समोर आली

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.